शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा-ओबीसीत भांडण लावण्याचा सरकारचा डाव, संजय विभुतेंचा आरोप

By अशोक डोंबाळे | Updated: September 30, 2023 18:11 IST

सांगलीत येत्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

सांगली : मराठा आणि ओबीसी समाजात आरक्षणावरून भांडण लावण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप ओबीसी, व्हीजेएनटी बहुजन परिषदेचे राष्ट्रीय सदस्य संजय विभुते व अरुण खरमाटे यांनी शनिवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत केला. सरकारचा डाव उधळून लावण्यासाठी मराठा-ओबीसींनी आरक्षणाच्या प्रश्नावर संघटित लढा दिला पाहिजे, असेही त्यांनी आवाहन केले.विभुते, खरमाटे पुढे म्हणाले, मराठा समाज कधीही ओबीसीतून आरक्षण मागत नव्हते. अचानक गेल्या महिन्यापासून मराठा समाजाने भूमिका बदलून ओबीसीतूनच आरक्षण देण्याची मागणी केली आहे. या मागणीवरून राज्य सरकारला ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावून राजकीय स्वार्थ साधायचा असण्याची शक्यता आहे. म्हणून ओबीसी आणि मराठा समाजाने आपसात भांडत बसण्यापेक्षा हक्काच्या आरक्षणासाठी सरकारविरोधात लढा उभारण्याची गरज आहे. मराठा समाजाला स्वतंत्र शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण देण्याची ओबीसी समाजाने यापूर्वीही मागणी केली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, अशी संघटनेची भूमिका आहे. ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी दि. ३ ऑक्टोबरला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी १० वाजता उपोषण करण्यात येणार आहे. तसेच कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून दि. ३ ऑक्टोबरपासून ओबीसी संवाद यात्रा निघणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

या मागण्यासाठी ओबीसींचा एल्गार

  • ओबीसीची बिहारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करा
  • ओबीसीमधून धनगर, कोळी व वडर समाजाला त्यांच्या हक्काप्रमाणे त्यांना एसटीमध्ये आरक्षण द्यावे.
  • मराठा समाजाला केंद्र व राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण द्या
  • मुस्लीम व अल्पसंख्याक समाजाला संरक्षण द्यावे
  • लोकसभा व विधानसभेत ओबीसीला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे
  • ओबीसी क्रिमिलेअर दाखल्याची अट रद्द करा
टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण