शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपंचमीसाठी शासकीय यंत्रणा, शिराळकर सज्ज, मिरवणुकीची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 17:36 IST

शिराळा येथे दि. १५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या जगप्रसिद्ध नागपंचमी सणासाठी शिराळकर आणि शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे नागपंचमी साजरी करण्यावर अनेक बंधने आली आहेत.

ठळक मुद्देनागपंचमीसाठी शासकीय यंत्रणा, शिराळकर सज्ज, स्वागत फलक झळकलेउच्च न्यायालयाच्या आदेशाने नागपंचमीवर अनेक बंधने, मिरवणुकीची तयारी

विकास शहाशिराळा : शिराळा येथे दि. १५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या जगप्रसिद्ध नागपंचमी सणासाठी शिराळकर आणि शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे नागपंचमी साजरी करण्यावर अनेक बंधने आली आहेत.शहरातील प्रत्येक मार्गावर स्वागत फलक झळकले आहेत. नाग मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते शहरातील प्रमुख मार्गावर स्वागत कमानी, स्वागत फलक लावणे, तसेच मिरवणुकीच्या वाहनांच्या सजावटीसाठीची तयारी करीत आहेत.

नगरपंचायतीमार्फत शहरातील रस्ते, गटारी, नाग स्टेडियम याची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले जात आहे. जलजन्य साथ उद्भवणार नाही व साथ उद्रेक होणार नाही याची दक्षता, पथदिव्यांची दुरुस्ती, मिरवणूक मार्ग तसेच भाविकांसाठी मार्गदर्शक फलक लावणे ही कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.

तहसील कार्यालय, नगरपंचायत, पोलीस ठाणे, अंबामाता ट्रस्ट यांची समन्वय समिती स्थापन केली आहे. अंबामाता मंदिर ट्रस्टमार्फत भाविकांच्या दर्शनासाठी तसेच मंदिर आवारातील नियोजन चालू आहे.

एसटी महामंडळामार्फत शिराळा आगाराच्या ७६, तसेच इस्लामपूर, सांगली, कोल्हापूर, कऱ्हाड, सातारा, पुणे, मलकापूर आदी ठिकाणच्या जादा बसेसची व्यवस्था केली आहे. शिराळा बस स्थानक, नाईक महाविद्यालय, मांगले फाटा, पाडळी नाका या ठिकाणी बस थांब्याची सोय केली आहे.पोलीस विभागाकडून एक जिल्हा पोलीस अधीक्षक, एक अप्पर पोलीस अधीक्षक, एक विभागीय पोलीस अधीक्षक, १४ पोलीस निरीक्षक, ३३ सहायक पोलीस निरीक्षक , पोलीस फौजदार, ३६५ पोलीस, ६५ महिला पोलीस, ५० वाहतूक पोलीस, १२ ध्वनी मापक पथके, २० कॅमेरे, चार दंगल नियंत्रण पथके, ५ साध्या वेशातील अधिकारी, ३० साध्या वेशातील कर्मचारी, घातपातविरोधी एक पथक, एक श्वानपथक असा बंदोबस्त ठेवला आहे.नाग स्टेडियमवर मिनी एस्सेल वर्ल्डची तयारी सुरू असून पाळणे, मेरी गो राउंड, मिठाई, खाद्यपदार्थ स्टॉल, हॉटेल्स, विविध प्रकारच्या वस्तूंचे विक्री स्टॉल सजले आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSangliसांगली