शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

गुगल नेव्हीगेशनने चुकवली डेंटलची नीट परीक्षा, दोन कुडचींनी केला गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 17:54 IST

College, college, educationsector, sangli, NeetExam, डेंटल शाखेतून पदवीधर झालेल्या अनेक विद्यार्थ्यांची पदव्युत्तर परीक्षा गूगल मॅपवर विसंबल्याने चुकली. या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले. सहानुभूतीचे धोरण ठेऊन आणखी एक परीक्षा घेण्याची मागणी पालकांनी केली आहे.

ठळक मुद्देगुगल नेव्हीगेशनने चुकवली डेंटलची नीट परीक्षा दोन कुडचींनी केला गोंधळ

सांगली : डेंटल शाखेतून पदवीधर झालेल्या अनेक विद्यार्थ्यांची पदव्युत्तर परीक्षा गूगल मॅपवर विसंबल्याने चुकली. या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले. सहानुभूतीचे धोरण ठेऊन आणखी एक परीक्षा घेण्याची मागणी पालकांनी केली आहे.तंत्रज्ञानावर नको तितके विसंबल्याने विद्यार्थ्यांना फटका बसला. डेंटल शाखेच्या पदव्युत्तर शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठीची देशव्यापी नीट परीक्षा बुधवारी (दि. १६) होती. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी जवळचे केंद्र म्हणून बेळगावची निवड केली. त्यांना कुडची हे केंद्र मिळाले होते. बेळगाव जिल्ह्यात दोन कुडची आहेत.

एक कुडची मिरजेपासून सुमारे तीस-पस्तीस किलोमीटरवर रायबाग तालुक्यात आहे, तर दुसरे बेळगाव शहराचे उपनगर आहे. परीक्षेला जाणार्या या विद्यार्थ्यांनी कुडचीच्या शोधासाठी परंतु गुगल मॅपवर नेव्हीगेशन लावले.

तास-दोन तासांच्या प्रवासानंतर बेळगावच्या कुडचीऐवजी रायबाग तालुक्यातील कुडचीमध्ये पोहोचले. गावात पोहोचल्यानंतरही परीक्षा केंद्र ५० मीटरवर असल्याचे गुगल नेव्हीगेशन सांगत होते. अवघ्या चार-पाच हजार लोकवस्तीच्या छोट्याशा खेड्यात परीक्षा केंद्र कसे असेल? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता.

गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना विचारले असता वैद्यकीय परीक्षेचे कोणतेही केंद्र गावात नसल्याचे त्यांनी सांगितले. रायबागमधील कुडची व बेळगावमधील कुडची ही दोन वेगवेगळी ठिकाणे असल्याचा खुलासाही केला.धास्तावलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा केंद्राचा संपर्क क्रमांक गुगलवरून शोधला. परीक्षेच्या संयोजकांनी दुपारी पावणेदोनपर्यंत आल्यास परीक्षा देता येईल असे सांगितले. पण या विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचता आलेच नाही. परीक्षा चुकल्याने वर्ष वाया गेले.

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालcollegeमहाविद्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्रSangliसांगली