केंद्र सरकारच्या शेती विधेयकाविरोधात भारत बंदला मिरजेत चांगला पाठिंबा मिळाला. शहरातील व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदवला. महाराणा प्रताप चौकात केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले.
सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी व्यवसाय बंद ठेवत शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकर्त्यांनी शहरातून रॅली काढून बंदचे आवाहन केले. महाराणा प्रताप चौकात केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करणार्या अय्याज नायकवडी, संजय मेंढे, मैनुद्दीन बागवान, अभिजित हारगे, चंदू मैगुरे, संजय काटे, प्रसाद मदभावीकर, विशाल राजपूत, अजित दोरकर, सचिन जाधव, संदीप व्हनमाने, स्वाती पारधी, वहिदा नायकवडी, योगेंद्र थोरात, सुनीता कोकाटे, हारूण खतीब, पप्पू शिंदे, बिल्किस बुजरूक, बाळ बरगाले, संतोष माने, विशाल लिपाणे, महेश बसर्गे यांसह आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.