शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Sangli: भांड्याची पावडर विकायला आले अण् दोन तोळे सोने लांबवले, भामट्यांचा शोध सुरु

By हणमंत पाटील | Updated: January 31, 2024 12:19 IST

प्रताप माने  गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील भेंदवाड परिसरातील वस्तीवर राहणाऱ्या महिलेस आम्ही भांड्याची पावडर विकणाऱ्या नवीन कंपनीच्या ...

प्रताप माने गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील भेंदवाड परिसरातील वस्तीवर राहणाऱ्या महिलेस आम्ही भांड्याची पावडर विकणाऱ्या नवीन कंपनीच्या प्रसिद्धीसाठी आलो आहाेत. आपल्याकडील तांब्याची भांडी तसेच सोने-चांदीचे दागिने पॉलिश करून देतो, असा बहाणा करत महिलेचे दाेन ताेळे साेने लंपास करण्यात आले. या प्रकारानंतर तरुणांनी या भामट्यांची परिसरात शोधाशोध केली; मात्र ते सापडले नाहीत.भेंदवाड परिसरात संपतराव पाटील यांच्यासह तीन ते चार कुटुंबे वस्तीवर राहतात. मंगळवारी सकाळी दोघे अज्ञात तरुण भांडी घासण्याच्या नवीन कंपनीच्या पावडरच्या प्रसिद्धीसाठी आल्याचे सांगत सिंधुताई पाटील यांच्याकडे आले. आम्ही तांब्याची भांडी पॉलिश करून देतो सांगत त्यांनी पाटील यांच्याकडील तांब्याची भांडी पॉलिश करून दिली. नंतर चांदीही पॉलिश करून देतो म्हणत त्यांचे चांदीचे काही दागिनेही चमकवून दिले. त्याचदरम्यान हातातील साेन्याच्या बांगड्याही पॉलिश करण्यासाठी त्यांनी सिंधुताईंना गळ घातली. त्यांच्यावर विश्वास ठेवत सिंधुताई यांनी आपल्या चार तोळ्यांच्या बांगड्या काढून त्यांच्याकडे दिल्या. पाॅलिशच्या बहाण्याने भामट्यांनी या बांगड्या पावडर व केमिकलमध्ये टाकून घासून काढल्या. नंतर दुसऱ्या एका भांड्यात केमिकलमध्ये हळद मिसळून त्यामध्ये बांगड्या टाकून दिल्या. पंधरा मिनिटांनंतर त्या बाहेर काढण्यास सांगून भामटे पसार झाले.ही बाब संशयास्पद वाटल्यावर सिंधुताई यांनी पती संपतराव पाटील यांना माहिती दिली. त्यांनी बांगड्या घेऊन गावातील सराफाकडे वजन केले असता चाळीस ग्रॅमच्या पाटल्या केवळ वीस ग्रॅम भरल्या. दोन तोळे सोने भामट्यांनी लंपास केले. या घटनेनंतर तरुणांनी परिसरात शोधाशोध केली; मात्र भामटे मिळाले नाहीत. रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलिसांत नोंद नव्हती.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी