शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

ऑन ड्युटी गोवा सहल नडली, अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीच; सांगली जिल्हा बँकेतील प्रकार  

By अविनाश कोळी | Updated: June 29, 2023 14:29 IST

सोशल मीडियावरील फोटोमुळे कारनामा उजेडात

सांगली : वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सुट्या रद्द केल्यानंतर जत तालुक्यातील जिल्हा बँकेच्या उत्साही सहा अधिकाऱ्यांनी ऑनड्युटी गोवा पर्यटनाचा आनंद लुटला. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. हा प्रकार समजताच बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या सर्वांची जत तालुक्यातून शिराळ्याला बदली केली.एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत जूनपर्यंत वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करण्याची सूचना सीईओ शिवाजीराव वाघ यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिली होती. त्यासाठी सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सुटी दिवशीही या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कर्ज वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण जिल्हाभर ही मोहीम सुरू आहे.प्रशासनाच्या आदेशानंतरही जत तालुक्यातील आठ अधिकाऱ्यांनी मागील शनिवारी, रविवारी बॅंकेला असलेल्या सुटीला लागून एक रजा टाकली आणि गोव्यात मौजमजा करण्यासाठी धावले. इकडे शाखेतील अन्य कर्मचारी मात्र सुटीदिवशीही कामावर येत वसुली करीत होते. याची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ यांनी या आठ कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी शिराळ्या तालुक्यात बदल्या केल्या.

सोशल मीडियावरील फोटोमुळे कारनामा उजेडातऑनड्युटी सहलीचा आनंद लुटताना त्यांनी गोव्यात गेलेल्या मौजमस्तीचा फोटो बॅंक कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तसेच सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळेच त्यांचा कारनामा समोर आला आणि कारवाई झाली.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक