शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळांमुळे झेडपीच्या शाळांवर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 15:30 IST

वाढत्या खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा जिल्हा परिषद शाळांवर परिणाम होताना दिसत आहे. एक ते दहा पटसंख्येच्या ९६, तर ११ ते २० पटसंख्येच्या चक्क २५९ शाळा असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षी एक ते दहा पटसंख्येच्या शाळांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी आणि शिक्षकांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देखासगी शाळांमुळे झेडपीच्या शाळांवर गंडांतरएक ते दहा पटसंख्येच्या शाळांमध्ये समायोजन शक्य

सांगली : वाढत्या खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा जिल्हा परिषद शाळांवर परिणाम होताना दिसत आहे. एक ते दहा पटसंख्येच्या ९६, तर ११ ते २० पटसंख्येच्या चक्क २५९ शाळा असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षी एक ते दहा पटसंख्येच्या शाळांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी आणि शिक्षकांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची संख्या दोन हजाराहून अधिक होती. पण, दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांची संख्या कमी होत असून, सध्या एक हजार ६९१ शाळा आहेत. या शाळांमध्येही यंदा शंभरापर्यंत घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ९६ शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या दहाच्या आत आहे.

कमी गुणवत्तेमुळेच या शाळांची पटसंख्या घटल्याचा निष्कर्ष काढून, त्या बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या शाळांच्या तीन किलोमीटर परिसरातील अन्य शाळांत यातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याने, शिक्षण हक्काचा भंग होणार नसल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे.नजीकच्या भागात जिल्हा परिषदेची शाळा उपलब्ध नसल्यास अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले. शिक्षकांचे नियोजन होत नसल्यास त्यांच्या सेवा शाळेमध्ये आवश्यकतेप्रमाणे उपयोगात आणाव्यात, असे याबाबतच्या निर्णयात म्हटले आहे.याचबरोबर ११ ते २० पटाच्या शाळांची संख्याही २५९ असल्यामुळे त्याही अडचणीतच आहेत. या शाळांमधील पटसंख्याही टिकून राहील, याची खात्री नाही. २१ ते ३० पटसंख्येच्या ३३७ शाळा असून, ३१ ते ६० विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांची संख्या ३४७ आहे.

एक ते ६० विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळा एक हजार ३९ आहेत. एकूण शाळांच्या ६० टक्केहून अधिक शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या जेमतेमच आहे. १२१ पेक्षा जास्त पटसंख्येच्या शाळांची संख्या केवळ ३७७ आहे. पटसंख्येवरुन जिल्हा परिषद शाळांसमोरील संकट किती गडद झाले आहे, ते स्पष्ट होत आहे.

खासगी इंग्रजी माध्यमाच्या आणि मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढू लागल्यामुळेच अनुदानातील शाळा अडचणीत आहेत. या शाळा भविष्यात टिकविण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाSangliसांगली