शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

स्मिता पाटील यांना सांगलीची उमेदवारी द्या, राष्ट्रवादीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 14:28 IST

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी आघाडीच्यावतीने सांगली लोकसभा मतदारसंघात आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. त्यामुळे या मागणीबाबत काय निर्णय होणार याकडे राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देस्मिता पाटील यांना सांगलीची उमेदवारी द्या, राष्ट्रवादीची मागणी सांगलीतील कॉंग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांबद्दलही राष्ट्रवादीमार्फत तक्रार

सांगली : कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी आघाडीच्यावतीने सांगली लोकसभा मतदारसंघात आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. त्यामुळे या मागणीबाबत काय निर्णय होणार याकडे राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे.राज्यातील आघाडीच्या जागांच्या आदलाबदलीचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा देण्यासाठीही कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सांगली वगळता राज्यातील अन्य जागांचा पर्याय शोधावा अशी मागणी केली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही स्मिता पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी आणि त्याबदल्यात अन्य कोणत्याही ठिकाणची जागा कॉंग्रेसला द्यावी, असे सुचविले आहे.पक्षाचे प्रदेश सचिव ताजुद्दीन तांबोळी यांच्यासह माजी सभापती संजय पाटील विश्वास तात्या पाटील, दत्ता हावले, विक्रम पाटील, कुलदीप मोरे यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे. स्मिता पाटील यांच्या उमेदवारीने भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण होणार आहे.

सध्या कॉंग्रेसकडे अस्तित्वात असलेल्या इच्छुकांपेक्षा राष्ट्रवादीकडे अनेक सक्षम पर्याय आहेत. यामध्ये दिलीपतात्या पाटील, आण्णासाहेब डांगे, अरुणअण्णा लाड यांचा समावेश आहे.उमेदवारीबरोबरच सांगलीतील कॉंग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांबद्दलही राष्ट्रवादीमार्फत तक्रार करण्यात येणार असल्याचे तांबोळी यांनी म्हटले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आघाडीतील मित्रपक्ष म्हणून एकाही राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांशी कॉंग्रेस नेत्यांनी संवाद साधला नाही.

राष्ट्रवादीला दुर्लक्षित करून एकांगीपणाने कॉंग्रेसची वाटचाल सुरू आहे. त्यांच्यामागे आम्ही फरफटत जाणार नाही. उमेदवारी किंवा रणनिती आखताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कधीही विश्वासात घेतले जात नाही. आजपर्यंत कधीही सामुहिक बैठक घेतली नाही. राष्ट्रवादीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याशी सल्लामसलत केलेली नाही. त्यांची जर एकला चलो ही भूमिका घेतली असेल तर आम्हालाही त्यांची गरज नाही.

कॉंग्रेसमध्ये जो पोरखेळ सुरू आहे तो अत्यंत क्लेशदायक आहे. आज पतंगराव कदम, आर. आर. पाटील, मदन पाटील हे नेते असते तर आघाडीची एवढी वाईट अवस्था झाली नसती. कॉंग्रेसमुळे राष्ट्रवादी ची नाचक्की होत आहे.

दोन दिवसात याबाबत निर्णय न झाल्यास सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे या मतदारसंघाची मागणी करणार आहोत. कॉंग्रेसकडे आम्ही आता पायघड्या घालणार नाही. त्यांच्यातील भांडणाचा फायदा नक्कीच भाजपला होऊ शकतो, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSangliसांगली