जत तालुका हा कायम दुष्काळी व अवर्षण क्षेत्र आहे. पाऊस नसल्याने विहिरींना पाणी नाही. त्यामुळे मोटारीच फिरल्या नाहीत तर वीज बिल कसे भरणार, असा सवाल निर्माण होतो आहे. संकटांना तोंड देत या भागातील शेतकरी कशीबशी आपली जमीन कसतात व घाम गाळून पिके घेतात. या सर्व प्रक्रियेत पिकांना पाणी देण्यासाठी शेती पंपांचा वापर होतो. या शेती पंपांच्या वापराची वीज बिले आल्यानंतर ती भरताना शेतकऱ्यांची दमछाक होते. शेती पंपांचे वीज बिल भरताना शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये व त्यांना हे बिल भरताना सवलत मिळावी. थकबाकीवरील व्याज १८ टक्के दराने न आकारता वीज नियामक मंडळाने दिलेल्या दराने आकारण्यात येणार आहे. शासनाने किमान शेतकऱ्यांना वीज बिलात ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी बिराजदार यांनी केली आहे.
कृषीच्या वीज बिलात सवलत द्या : बिराजदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:18 IST