शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वीस वर्षांनंतर एकदा भाजपला संधी द्या : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:06 IST

वीस वर्षांनंतर महापालिकेत आता एकदा भाजपला संधी द्या. भाजपचा महापौर झाल्यानंतर महापालिका क्षेत्रातील सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरजेत डॉक्टर्स, वकील, अभियंते व उद्योजकांच्या बैठकीत दिले.

ठळक मुद्देमिरजेतील बैठकीत आवाहन; डॉक्टर्स, वकील, अभियंते व उद्योजकांशी संवाद साधून मतदानाचे आवाहन

मिरज : वीस वर्षांनंतर महापालिकेत आता एकदा भाजपला संधी द्या. भाजपचा महापौर झाल्यानंतर महापालिका क्षेत्रातील सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरजेत डॉक्टर्स, वकील, अभियंते व उद्योजकांच्या बैठकीत दिले. सुशिक्षित मंडळी मतदान करीत नसल्याने वाईट व्यक्ती निवडून येतात, हे लोकशाहीला घातक असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

महसूलमंत्री पाटील म्हणाले की, यापूर्वीच्या राज्यकर्ते सत्ताधाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याने बुध्दिजीवी मंडळींना राजकारण्यांबद्दल चिड आहे. पंतप्रधान मोदी यांनी राज्यकर्ता प्रामाणिक असतो, असा विश्वास निर्माण केला आहे. चांगली व्यक्ती निवडून देणे सामाजिक काम असून, बुध्दिजीवी मंडळींनी या निवडणुकीत मतदानापासून दूर राहू नये, असेही आवाहन मंत्री पाटील यांनी केले.

याप्रसंगी अ‍ॅड. राजू शिरसाट, डॉ. मोहन पटवर्धन, श्रीशैल जयगोंड, रवींद्र फडके, शंकर परदेशी, महेंद्र गाडे यांनी शहरातील रस्ते, क्रीडांगण, सांडपाणी यासह विविध समस्या सांगितल्या. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सर्व समस्या दूर करण्याचे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले. आ. सुरेश खाडे यांनी महापालिकेत काँग्रेसची सत्ता असतानाही भाजप शासनाने शहराच्या विकासासाठी मोठ्याप्रमाणात निधी दिल्याचे सांगितले.

दीपक शिंदे, मकरंद देशपांडे, डॉ. रवींद्र आरळी, नगरसेविका संगीता खोत, विवेक कांबळे, आनंदा देवमाने, गायत्री कुळ्ळोळी, गणेश माळी, अ‍ॅड. वासुदेव ठाणेदार, अ‍ॅड. किरण जाबशेट्टी, अ‍ॅड. किरण जाधव, शशांक जाधव, वागेश जाधव, रमेश पवार, तानाजी ओमासे, सुभाष मिश्रा, ओंकार शुक्ल, श्रीधर पटवर्धन उपस्थित होते.सांगली-मिरजेच्या समस्या सोडवूचंद्रकांत पाटील म्हणाले, सुशिक्षित मंडळी निवडणूक मतदानापासून दूर राहत असल्याने वाईट प्रवृत्तींना संधी मिळते. काँग्रेसमुळे शहराचा विकास खुंटला आहे. यावेळी भाजपला संधी द्या. भाजपचा महापौर झाल्यानंतर महिन्यातून दोनवेळा सांगली, मिरजेस भेट देऊन समस्या सोडवू.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटील