शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देववाडीत आढळली ‘जायंट आफ्रिकन’ गोगलगाय, पाठीवर पाव किलो वजनाचा शंख; पिकांसाठी ठरते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 14:35 IST

या गोगलगायीचे मूळ ठिकाण पूर्व आफ्रिका असून, सध्या ती जगातील अनेक देशांमध्ये सापडते. तिचा इतर देशामध्ये प्रसार कसा झाला, याबद्दल ठोस माहिती नाही.

विकास शहा

शिराळा : देववाडी (ता. शिराळा) येथील जोतिबा मंदिरात पाठीवर पाव किलो वजनाचा शंख असलेली जायंट आफ्रिकन गोगलगाय आढळली आहे. देववाडीतील जोतिबा मंदिरात असणाऱ्या या गोगलगायीच्या पाठीवर तिच्या वजनापेक्षा मोठ्या आकाराचा शंख तयार झाला आहे. यामुळे तिला जास्त हालचाल करता येत नाही.

गावाच्या दक्षिणेला जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ असणाऱ्या जोतिबाच्या छोट्या मंदिरात या गोगलगायीचा वावर आहे. पंधरा दिवसांपूर्वी ज्ञानदेव खोत यांना गोगलगाय दिसली. सुरुवातीला आकाराने लहान असणारा शंख हळूहळू मोठा होत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून शंखाचा आकार खूपच मोठा झाल्यामुळे आता या गोगलगायीला गतीने चालता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत वारणा महाविद्यालयचे प्रा. डॉ. ए. आर. भुसनार म्हणाले, या गोगलगायीला जायंट आफ्रिकन गोगलगाय या नावाने ओळखले जाते. गोगलगायीचे मूळ ठिकाण पूर्व आफ्रिका असून, सध्या ती जगातील अनेक देशांमध्ये सापडते. तिचा इतर देशामध्ये प्रसार कसा झाला, याबद्दल ठोस माहिती नाही.

या गाेगलगायीची वाढ वेगाने होते. थंड व आर्द्रतायुक्त वातावरण या गोगलगायीसाठी पोषक असते. ही जागतिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली शेतीपिकावरील कीड आहे. ही मोठ्या संख्येने आल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. तसेच पिकावर वेगवेगळ्या रोगाचा प्रसार करते. असे तज्ज्ञांनी सांगितले.

शेतीपिकांसाठी घातक

शेतीपिकावरील ही घातक कीड आहे. ही गोगलगाय अख्याटीनिडी या कुळात येते. तिचे शास्त्रीय नाव लिस्साचाटीना फुलिका असे आहे. ती भारतीय नाही. १९३१ मध्ये चीनमध्ये तिचे वास्तव्य आढळले. गहू, भात व लहान उसासाठी ती घातक आहे. ज्वारीच्या आकाराची ती अंडी घालते. नर-मादीचे प्रमाण कमी असल्यामुळे उत्पत्ती कमी आहे. पिकांपासून रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात ती करते.आफ्रिकेत पिकावरील मोठी कीड म्हणून तिची ओळख आहे. भारतात सामान्यत: आढळणाऱ्या गोगलगायी पावसाळ्यातच बाहेर पडतात. त्यांचे शरीर नाजूक असते. या गोगलगायी पिकांचे कमी नुकसान करतात.

थंड वातावरण पोषक

थंड व आर्द्रतायुक्त वातावरण या गोगलगायीसाठी पोषक असते. ही जागतिकदृष्ट्या महत्वाची असलेली शेतपिकावरील कीड आहे. ही मोठ्या संख्येने आल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. तसेच पिकावर वेगवेगळ्या रोगाचा प्रसार करते. असे तज्ञांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगली