शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: घोगाव योजनेची जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा ठणठणाट

By अशोक डोंबाळे | Updated: April 4, 2024 19:06 IST

विटा शहरात पाणीटंचाई : दोन दिवसांपासून योजना बंदच

विटा : विटा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या घोगाव नळ पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी बलवडी (भा.) येथे फुटल्याने गेल्या दोन दिवसांपासून शहरात पाण्याचा ठणठणाट आहे. जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत शहरात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण होणार आहे.दरम्यान, अनेक मालमत्ताधारकांना खासगी पाण्याचे टॅँकर मागवावे लागत असल्याने टॅँकर चालक खुश झाले आहेत. पलूस तालुक्यातील घोगाव येथील कृष्णा नदीपात्रातून विटा शहराला नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जाते. नगरपालिका नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करीत असली तरी ते पाणी पूर्ण दाबाने मिळत नाहीच, शिवाय पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकही बिघडले असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.मात्र या योजनेची बलवडी (भा.) येथील पवार मळ्याजवळ मंगळवारी रात्री मुख्य जलवाहिनीच फुटली आहे. परिणामी, लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. ही जलवाहिनी फुटल्याने मंगळवारी रात्रीपासून विटा शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे. या फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी विटा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी गेल्या दोन दिवसांपासून बलवडी येथे काम करीत आहेत. परंतु, त्यात त्यांना अद्यापही फारसे यश आलेले नाही. त्यामुळे अजून किती दिवस पाणीपुरवठा बंद राहणार? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.योग्य नियोजनाची गरज..विटा नगर परिषदेने घरगुती एका नळ कनेक्शनला वार्षिक तीन हजार ५०० रुपये पाणीपट्टी आकारली आहे. त्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे वर्षाची पाणीपट्टी भरून नागरिकांना सहा महिनेच पाणी दिले जात आहे. त्यात आणखी असा बिघाड होऊन पाणी न मिळण्याच्या दिवसात वाढ होत आहे. एक दिवसाआड पाणी दिले तरी पुरेसे व उच्च दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाणी देण्याच्या व्यवस्थेत बदल करून त्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी