शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता थेट पोस्टातून मिळणार अस्सल सेंद्रिय देवगड हापूस आंबा; उत्पादक ते ग्राहक सेवेचा उपक्रम

By अविनाश कोळी | Updated: March 28, 2024 16:40 IST

शेतकऱ्याशी केला करार

सांगली : बाजारातील आंब्याच्या अस्सलतेची शंका नेहमीच ग्राहकांकडून उपस्थित होत असते. सांशकतेच्या धुक्यातून ग्राहकांना बाजूला करीत आता पोस्ट विभागाने उत्पादक ते ग्राहक अशी सेवा सुरू केली आहे. देवगडचा अस्सल अन् तोही सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला हापूस आंबा पोस्टातून मिळणार आहे.भारतीय टपाल विभागामार्फत अनेक ग्राहक उपयोगी योजना सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून थेट उत्पादकांना ग्राहकाशी जोडण्यासाठी पोस्टाने पाऊल उचलले आहे. शेतकऱ्याचा माल ग्राहकापर्यंत पोहचवून त्याच्या मालास योग्य ते मूल्य व बाजारपेठ मिळवून देण्यात येत आहे. देवगड हापूस आंबा आता सांगली शहरातील निवडक टपाल कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येत आहे.

शेतकऱ्याशी केला करार

कोकणातील दहिबाव (ता. देवगड) येथील फळ उत्पादक श्रीधर ओगले यांच्याशी पोस्टाने नुकताच करार केलेला आहे. ओगले हे आंबा व्यवसायात १८ वर्षे कार्यरत आहेत. तसेच ते सिंधुदुर्ग जिल्हा फळ प्रक्रिया उत्पादक संघाचे अध्यक्ष आहेत.

सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला आंबाओगले यांच्या बागेतील आंब्यास जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. कोणत्याही रासायनिक पद्धतीच्या वापर शिवाय नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला आंबा ते उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना खात्रीशीर उत्पादन मिळण्यास मदत होणार आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मिळणार ग्राहकांना आगाऊ नोंदणी करुन आंबा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिला जाणार आहे. पेटी घरपोहोच हवी असल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या आंबा पेटीच्या डिलिव्हरीची तारीख कळविण्यात येणार आहे.

मुंबई, पुण्यातील लोकांनाही मिळणार आंबारत्नागिरी पोस्ट कार्यालयामार्फत येत्या काही दिवसांत आंब्याच्या बुकिंगची योजना सुरू होणार आहे. याच कार्यालयामार्फत मुंबई व पुण्यातील लोकांना आंब्यासाठी बुकिंग करता येईल. रत्नागिरी कार्यालयामार्फत नोंदणी करावयाची पोस्ट कार्यालयेसुद्धा जाहीर होतील. सांगलीतील चार पोस्ट कार्यालयात नोंदणीसाठी ऑफलाईनचीच व्यवस्था आहे. ऑनलाईन नोंदणी सध्या तरी करता येत नाही.

याठिकाणी करा नोंदणी

ग्राहकांसाठी अत्यंत चांगली योजना पोस्टाने आणली आहे. चांगल्या दर्जाचा आंबा यानिमित्ताने ग्राहकांना मिळणार आहे. नोंदणी केलेल्या ग्राहकांना प्राधान्याने माल देण्यात येणार असल्याने, ग्राहकांनी आगावू नोंदणी करावी व आपली गैरसोय टाळावी. -  गुरुदास मोंडे, प्रवर डाक अधीक्षक, सांगली पोस्ट

टॅग्स :SangliसांगलीPost Officeपोस्ट ऑफिसMangoआंबा