शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

‘सृजन शिक्षण’ ग्रुपने दिला शिक्षक-विद्यार्थ्यांमधील लेखकाला जन्म : - शिक्षकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 01:17 IST

शरद जाधव। सांगली : वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद शाळा नेहमीच अग्रेसर असतात. या शाळांतील शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक ...

ठळक मुद्दे जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी होतोय प्रयत्नउपक्रमातून घडलेल्या एका विद्यार्थ्याचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

शरद जाधव।सांगली : वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद शाळा नेहमीच अग्रेसर असतात. या शाळांतील शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक खासगी शाळांनाही आव्हान देतील असे विद्यार्थी तयार केले आहेत. अशाच उपक्रमशील शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत, त्यांना प्रेरणा देण्यासाठी सृजन शिक्षण ग्रुप कार्यरत आहे.

शिक्षकांमध्येही गुणवत्ता असते, मात्र त्यांना पाठ्यपुस्तकाबाहेरील जग दिसतच नाही, असा एक सूर असतो. सध्या शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल आणि नवी आव्हाने आपल्या शिक्षकांना कळावीत, यासाठी असा एखादा ग्रुप असावा, हा विचार साहित्यिक व शिक्षण क्षेत्रातील अधिकारी नामदेव माळी यांच्या मनात आला. त्यांनी आपला विचार उपक्रमशील शिक्षक कृष्णात पाटोळे यांना बोलून दाखविला आणि त्याक्षणीच ‘सृजन शिक्षण’चे काम सुरू झाले. मिरज तालुक्यातील प्राथमिक शाळेतील आठ उपक्रमशील शिक्षकांचा यात सहभाग आहे. याच शिक्षकांनी एकत्र येत लिहिलेले ‘आठ शिक्षकांची आत्मवृत्ते’ पुस्तक प्रसिध्द झाले आहे. या प्रेरणेतून शिक्षक तर लिहिते झालेच, शिवाय विद्यार्थ्यांनाही लिखाणाची सवय लावली आहे. त्यातूनच गौतम पाटील या विद्यार्थ्याच्या काव्यलेखनाला राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.

या ग्रुपमध्ये नामदेव माळी यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णात पाटोळे, विकास देवके, विजय भिसे, विश्वास आठवले, सचिन पाटील, राजाराम केंगार, राजेंद्र राऊत, भीमराव कांबळे, श्रध्दा कुलकर्णी आदी उपक्रमशील शिक्षक कार्यरत आहेत. लुल्ला चॅरिटेबल ट्रस्ट, माजी महापौर सुरेश पाटील यांच्या सहकार्यातून शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. २०१५ मध्ये पहिल्या राज्यव्यापी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले, त्यात शैक्षणिक विषयांवर विचारमंथन करण्यात आले. त्यानंतर मराठवाडा, विदर्भ येथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांसाठीही ‘सृजन शिक्षण’ने कार्यशाळा घेतली.

शिक्षण परिषद म्हणजे केवळ व्याख्यानेच न ठेवता, प्रत्येक शिक्षण परिषदेला एक ‘थीम’ असते. त्यानुसार पहिल्या परिषदेसाठी ‘ज्ञानरचनावाद’, तर त्यानंतरच्या परिषदेत ‘गुणवत्तावाढ’, ‘नवोपक्रम’ विषय घेऊन राज्यातील शिक्षणतज्ज्ञांना मार्गदर्शनासाठी पाचारण केले होते.केल्याने होत आहे रे...‘सृजन शिक्षण’मधील सर्व सदस्य हे प्राथमिक शिक्षक आहेत. भविष्यातील सुदृढ समाज निर्मिती शिक्षकांच्या हाती असते, हेच ओळखून आपला सहकारी आव्हानांना सामोरे जाण्यास तयार व्हावा व त्याला नवीन बदल सहजपणे आत्मसात व्हावेत यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. जिल्हा परिषदेच्या शाळा आणि तेथील गुणवत्तेविषयी अनेकजण प्रश्नचिन्ह उपस्थित करत असले तरी, ‘सृजन शिक्षण’च्या सदस्यांनी ‘केल्याने होत आहे रे...’ची साद दिली आहे.सृजन शिक्षणतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या प्रत्येक उपक्रमानंतर मान्यवरांसोबत सृजन शिक्षणचे सदस्य मनमोकळेपणाने एकत्र येतात.

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळा