शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli - वारणा डावा कालव्यात अडकला गवा, वनविभागाने तीन तासांच्या अथक प्रयत्नाने केली सुरक्षित सुटका

By श्रीनिवास नागे | Updated: March 28, 2023 16:50 IST

पुनवत (जि. सांगली ) : शिराळे खुर्द (ता. शिराळा) येथे वारणा डावा कालव्यात अडकलेल्या गव्याची वनविभागाच्या पथकाने सुमारे तीन ...

पुनवत (जि. सांगली) : शिराळे खुर्द (ता. शिराळा) येथे वारणा डावा कालव्यात अडकलेल्या गव्याची वनविभागाच्या पथकाने सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नाने सुरक्षित सुटका केली. थकलेल्या अवस्थेतील गवा जंगलाच्या दिशेने निघून गेला.शिराळे खुर्द - फुपेरे गावच्या हद्दीवर पावले वस्तीनजीक मादी जातीचा गवा वारणा डावा कालव्यात उतरला होता. या परिसरात कालव्याला अस्तरीकरण असल्याने गव्याला कालव्यातून बाहेर पडता येत नव्हते. वाट शोधण्यासाठी गवा कालव्यात येर-झाऱ्या मारत होता. ही माहिती मिळताच वनविभाग, बिळाशीचे वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक पी. एन. पाटील, बिऊरचे वनरक्षक हणमंत पाटील यांच्यासह अमर पाटील, तानाजी खोत, सचिन पाटील, संजय पाटणकर, चंद्रकांत पाटील, शिवाजी सावंत आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शिराळे खुर्द, फुपेरे येथील ग्रामस्थही येथे मोठ्या संख्येने जमले होते. वनविभागाने जेसीबीच्या साहाय्याने रस्ता करून गव्याला योग्य दिशेला कालव्याबाहेर काढले. हे काम जवळपास तीन तास चालले होते. गवा थकलेल्या अवस्थेत दिसत होता. गव्याला कालव्याबाहेर काढण्यासाठी वन विभागाला ग्रामस्थानीही सहकार्य केले. कालव्यातून बाहेर आल्यानंतर गवा पूर्वेच्या जंगलाच्या दिशेने निघून गेला. वन कर्मचारी त्याच्यावर लक्ष ठेवून होते. वन्य प्राण्यांबाबत सर्वांनी दक्षता घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभाग