शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शिराळा तालुक्यात गव्यांचा वावर नागरी वस्तीत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 19:36 IST

शिराळा शहरासह तालुक्यात बिबट्या पाठोपाठ आता गव्याचा वावर वाढला

शिराळा : शिराळा तालुक्यातील मोरणा धरण जवळील बामनकी परिसरात आज शुक्रवारी चार गव्यांचे दर्शन झाले. यानंतर हे गवे तडवळे येथून जंगल परिसरात गेले. यामुळे शेतकरी, नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.आज सकाळच्या सुमारास गवे मोरणा धरण काठावर बसल्याचे काही नागरिकांना दिसले. गव्यांना नागरिकांनी हुसकवले असता ते उपवळे, तडवळे येथून पुढे जंगलात निघून गेले. या गव्यांनी गायकवाड मळ्यात पिकांचे नुकसान केल्याचे आढळून आले आहे.याआधीही शहरा नजीक असणाऱ्या गोरक्षनाथ मंदिर, कापरी, जांभळेवाडी, धुमालवाडी, बिऊर, पावलेवाडी, भाटशिरगाव परिसरात  गव्यांचे दर्शन झाले होते. या गव्यांना सुजयनगर परिसरात हुसकवले असता त्यावेळी हे गवे ऊसाच्या शेतीत घुसले. याचवेळी उसातून बिबट्या बाहेर आला होता.शिराळा शहरासह तालुक्यात बिबट्या पाठोपाठ आता गव्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती तर शेतांच्या कामात व्यत्यय येत आहे. या बिबट्यांचा व गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. चांदोली राष्ट्रीय उद्याना मध्ये अपेक्षित खाद्य मिळत नसलेने बाहेर मानवीवस्तीत प्राण्यांचा वावर वाढला आहे.वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रकांत देशमुख, देवकी तसीलदार, हणमंत पाटील, संपत देसाई, बाबा गायकवाड, नामदेव सिद, संभाजी पाटील यांनी या परीसराची पाहणी केली.

टॅग्स :Sangliसांगली