शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गॅस प्रमाणेच वीज अनुदानही मिळणार आता खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 17:49 IST

मोफत वीज आता बंद होणार आहे. केंद्र सरकार वीज कंपन्यांना अनुदान न देता थेट ग्राहकांच्या खात्यावर जमा करेल. गॅसच्या अनुदान सारखा हा प्रकार आहे.

संतोष भिसेसांगली : मोफत वीज आता बंद होणार आहे. केंद्र सरकार वीज कंपन्यांना अनुदान न देता थेट ग्राहकांच्या खात्यावर जमा करेल. गॅसच्या अनुदान सारखा हा प्रकार आहे. ग्राहकांना मात्र अनुदान शिवाय पूर्ण बिले मिळतील. साहजिकच सध्याची बिले खूपच वाढून येणार हे निश्चित आहे. वीज विधेयक केंद्र सरकारच्या आगामी हिवाळी अधिवेशनात सादर केले जाईल. यामुळे फक्त गरजवंतांनाच वीज अनुदानाच फायदा मिळणार आहे.सर्वच ग्राहकांना शंभर टक्के दराने वीज घ्यावी लागेल. त्यानंतर ग्राहकांच्या प्रकारानुसार त्याच्या खात्यावर अनुदान स्वरुपात राहिलेली रक्कम जमा होईल. कृषी, उद्योग, वाणिज्य आणि घरगुती अशा सर्वच श्रेणीतील ग्राहकांसाठी हा नवा पॅटर्न लागू राहणार आहे.बिलिंगसाठी वेगवेगळे टप्पे- सध्या वीज बिलाची आकारणी वेगवेगळ्या टप्प्यात होते. ० ते १०० युनिट, १०१ ते ३०० युनिट, ३०१ ते ५०० युनिट व त्यापुढील युनिट नुसार बिले दिली जातात.- कृषी, वाणिज्य, उद्योग, घरगुती अशा वेगवेगळ्या ग्राहकांनुसार विजेचे दरही वेगवेगळे आहेत. सार्वजनिक संस्था, पथदिवे अशा अन्य काही वर्गवारीही आहेत.- सर्वाधिक प्रति युनिट वीजदर उद्योगांसाठी आहे. महावितरणच्या एकूण महसुलात ही याच क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे. तब्बल ७२ टक्के महसूल उद्योग क्षेत्रातून मिळतो.सध्या सर्वांनाच अनुदान- सध्या सर्वच श्रेणीतील ग्राहकांना अनुदानित स्वरुपातील वीज मिळते. विशेषतः घरगुती व कृषी क्षेत्राचे अनुदान मोठे आहे.- उद्योग क्षेत्राला सर्वाधिक दर लावून मिळणाऱ्या महसुलातून कृषी व घरगुती ग्राहकांना अनुदान स्वरुपात वीज मिळते.- घरगुती विजेचे अनुदान टप्प्याटप्प्याने संपविण्यासाठी २०१९ मध्ये वीज दर वाढविण्यात आले.

आमचेच पैसे घेऊन परत देण्याचा हा द्राविडी प्राणायाम कशासाठी ? हे शासनाने स्पष्ट करावे. अनुदानाची आवश्यकता नसलेल्या ग्राहकांना वाढीव दराने बिले द्यावीत. गॅस अनुदानाची पद्धती लावली, तर ग्राहकांना अतिशय महागड्या दराने वीज घ्यावी लागेल. - किरण वडगावे, वीज ग्राहक, सांगली

वीजजोडणी मूळ मालकाच्या नावे असल्या भाडेकरुने बिले कसे भरावीत ? ही समस्या पुढे येणार आहे. मोठमोठी बिले आल्यास गरीब ग्राहक ती भरणार नाहीत, परिणामी थकबाकीची समस्या पुन्हा पुढे येईल. - वीरेश गुजर, वीज ग्राहक, सांगली

टॅग्स :Sangliसांगलीelectricityवीज