शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत गुंडाच्या टोळीकडून दगडफेक; ग्रामस्थ एकत्र येताच सर्वांनी काढला पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:31 IST

; वाल्मिकी आवासमध्ये भरदिवसा थरार; गुंड पवन साळुंखेसह चौदाजणांवर गुन्हा सांगली : जुना बुधगाव रस्त्यावर अत्यंत संवेदनशील भाग समजल्या ...

ठळक मुद्देरहिवाशांना मारहाण : पाचजण जखमीरहिवाशांना मारहाण : पाचजण जखमी

; वाल्मिकी आवासमध्ये भरदिवसा थरार; गुंड पवन साळुंखेसह चौदाजणांवर गुन्हासांगली : जुना बुधगाव रस्त्यावर अत्यंत संवेदनशील भाग समजल्या जाणाऱ्या वाल्मिकी आवासमध्ये गुंड पवन साळुंखे टोळीने धुमाकूळ घालत रहिवाशांवर प्रचंड दगडफेक केली. पान दुकान चालकासह पाच जणांना टोळीने काठीने बेदम मारहाण केली. सोमवारी भरदिवसा ही थरारक घटना घडली. घटनेनंतर रहिवासी रस्त्यावर उतरल्यानंतर टोळीने पलायन केले.गुंड पवन साळुंखे टोळीवर कारवाई करावी, या मागणीसाठी रहिवाशांनी शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. रहिवाशांचा आक्रमकपणा पाहून पोलिसांनी पवन साळुंखे, समर्थ भारत पवार, रमजान आणि सुहेल (पूर्ण नाव निष्पन्न नाही) या चौघांविरुद्धच गुन्हा दाखल केला. त्यांच्या शोधासाठी एक पथकही रवाना केले. वाल्मिकी आवासमध्ये गुन्हेगारांच्या टोळ्या आश्रयास आहेत. दहशत माजवून रहिवाशांना ते दमदाटी करतात. अनेकदा येथे मारामारी व लूटमारीच्या घटना घडल्या आहेत. एकाचा खूनही झाला आहे. गांजा ओढणे, मद्य प्राशन करण्यासाठी गुन्हेगारांनी येथे अड्डाच केला आहे. या गुन्हेगारी टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची रहिवाशांनी अनेकदा मागणी केली, पण शहर पोलिसांनी नेहमीच दुर्लक्ष केले.सोमवारी दुपारी चार वाजता पवन साळुंखेसह चौघेजण वाल्मिकी आवासमध्ये आले. ते मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी तेथील पान दुकानदारास दमदाटी करुन दुकान बंद करण्यास सांगितले. त्याने ‘काय झालं’, अशी विचारणा केली. त्यानंतर चौघांनी पान दुकानदारास दगड व काठीने बेदम मारहाण केली. त्याने आरडाओरड केल्यानंतर काही रहिवासी तिथे आले. त्यांना पाहून या चौघांनी दगडफेक सुरु केली. दगड चुकवित रहिवासी तेथून पळून गेले. त्यानंतर पुन्हा पान दुकानदारास मारहाण केली. हा प्रकार पाहून संपूर्ण वाल्मिकी आवासमधील रहिवासी रस्त्यावर उतरले. सर्व रहिवासी चाल करुन येत असल्याचे लक्षात येताच चौघांनी तेथून पळ काढला. दगडफेकीत पान दुकानदारासह पाचजण जखमी झाले आहेत.या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस दाखल झाले. रहिवाशांनी पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले. पवन साळुंखेविरुद्ध कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. साळुंखेसह चौघांना अटक केल्याशिवाय येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलीस ठाण्यासमोरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. पोलीस अधिकाºयांनी शोधासाठी पथक रवाना केले असल्याचे सांगितले.पवन साळुंखे रेकॉॅर्डवरील गुन्हेगारगुंड पवन साळुंखे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. अनेकदा त्याला पोलिसांनी अटक केली. पण तरीही त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरुच राहिल्या आहेत. वाल्मिकी आवासमध्ये तो नेहमीच येऊन दादागिरी करीत असे. त्याच्या दहशतीला रहिवासी घाबरत होते. सोमवारी तो रहिवाशांच्या तावडीत सापडला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.गुंड पवन साळुंखे याच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी वाल्मिकी आवासमधील रहिवाशांनी सोमवारी सायंकाळी सांगली शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. 

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी