शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

टोळक्याचा हाॅटेलमध्ये धिंगाणा, तोडफोड करून दोन लाखांचे नुकसान, १५ जणावर गुन्हा

By शीतल पाटील | Updated: February 24, 2023 21:10 IST

याप्रकरणी पंधरा जणांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

सांगली : विश्रामबाग परिसरातील हसनी आश्रम येथील हाॅटेल आर्यामध्ये गुरुवारी टोळक्याने धिंगाणा घालत तोडफोड केली. हल्लेखोरांनी दोन ते अडीच लाखांचे नुकसान केले. हॉटेलच्या गल्ल्यातील २२ हजारांची रोकडही लंपास केली. खंडणीची मागणी करीत जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. गुरुवारी दुपारी अडीच ते रात्री आठ वाजेपर्यंत टोळक्याचा धिंगाणा सुरू होता. याप्रकरणी पंधरा जणांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

याप्रकरणी गणेश पाटील, सोहेल शेख, नदीम शेख, अरुण चव्हाण, विनायक दुधाळ, रिक्षावाला यश दुधाळ, बापशा चव्हाण यांच्यासह अनोळखी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल चालक आकाश संतोष शिंदे (वय २६, रा. स्फूर्ती चौक, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की हसनी आश्रम येथे महेश कर्णी यांचे हॉटेल आर्या आहे. फिर्यादी शिंदे यांनी सहा महिन्यांपूर्वी हॉटेल चालवण्यासाठी घेतले आहे. हॉटेलमध्ये १४ कामगार आहेत. गुरुवारी दुपारी अडीच्या सुमारास संशयित गणेश पाटील, नदीम शेख व त्यांच्यासोबत पाच जण हॉटेलमध्ये आले. त्यावेळी संशयितांनी जेवणाची मागणी केली. हॉटेल चालकाने नकार दिला. त्यानंतर पन्नास हजारांच्या खंडणीची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने संशयितांनी धक्काबुक्की करून ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी शिंदे यांनी घटनेबाबत गणेश पाटील याला जाब विचारल्यानंतर संशयिताने दमबाजी केली.

दुपारी चारच्या सुमारास हॉटेलमध्ये काही जणांनी लोखंडी रॉड घेऊन तोडफोड केली. सारा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून गणेश पाटील व त्याचे साथीदार बबलू माने, सोहेल शेख दिसून आले. त्यानंतर पावणे सातच्या सुमारास पुन्हा संशयितांनी हॉटेलमध्ये तोडफोड केली. संशयितांनी हॉटेलमधील सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान केले आहे. गल्ल्यातील २२ हजारांची रक्कमही चोरी केली. दरम्यान, घटनेनंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला. सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील अधिक तपास करत आहेत.माजी नगरसेविकेच्या पतीची मध्यस्थीदरम्यान, या तोडफोड प्रकरणात माजी नगरसेविकेच्या पतीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण तो सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी चालविली होती. अखेर फिर्यादीने शपथपत्र देत त्याचा तोडफोडीशी संबंध नसल्याचे सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी