शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi : उजव्या सोंडेच्या गणपतीच्या रथोत्सवाला तासगावात दिमाखात सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 16:35 IST

तासगावसह महाराष्ट्रातील लाखो गणेशभक्‍तांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील उजव्या सोंडेच्या गणपतीच्या 239 व्या रथोत्सवाला दुपारी मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. दुपारी गणेश मंदिरापासून रथोत्सवाला हजारो भाविकांच्या जनसागराच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. श्रीमंत राजेंद्र पटवर्धन यांच्यासह प्रमुख मानकऱ्यांच्या उपस्थितीत श्री पुजन झाले. त्यानंतर रथोत्सवाला सुरुवात झाली.

ठळक मुद्देउजव्या सोंडेच्या गणपतीच्या रथोत्सवाला तासगावात दिमाखात सुरुवात हजारो भाविकांच्या जनसागराची उपस्थिती

तासगाव : तासगावसह महाराष्ट्रातील लाखो गणेशभक्‍तांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील उजव्या सोंडेच्या गणपतीच्या 239 व्या रथोत्सवाला दुपारी मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. दुपारी गणेश मंदिरापासून रथोत्सवाला हजारो भाविकांच्या जनसागराच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. श्रीमंत राजेंद्र पटवर्धन यांच्यासह प्रमुख मानकऱ्यांच्या उपस्थितीत श्री पुजन झाले. त्यानंतर रथोत्सवाला सुरुवात झाली.

मराठा साम्राज्याचे शेवटचे सेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांनी गणपतीपुळे येथील गणेशाचे दुसरे स्थान म्हणून उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाची तासगाव येथे स्थापना केली. त्याचवेळी त्यांनी दक्षिणेत रूढ रथयात्रेची संकल्पना आणली.

तीस फूट उंचीचा तीन मजली लाकडी रथ प्रतिवर्षी ऋषी पंचमी दिवशी लाखो भाविक हाताने ओढतात. 238 वर्षांपासून ही परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. या रथामधून बाप्पा, श्रीकाशिविश्‍वेश्‍वर यांच्या भेटीसाठी जातात. तेथून ते परत येतात. दुसऱ्या मजल्यावर "श्रीं' ची मूर्ती ठेवलेली असते. रात्री पटवर्धन राजवाड्यातील गणपतीचे विसर्जन होऊन उत्सव संपतो. दुपारी रथोत्सवास मोठया उत्साहात सुरुवात झाली. रथ ओढण्यासाठी भाविकांची मोठी झुंबड उडाली होती. शहरातील सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. मिरवणूक मार्ग भाविकांच्या घोषणांनी दणाणून गेला होता. 'गणपती बाप्पा मोरया' , 'मंगलमूर्ती मोरया', मोरया, मोरया च्या घोषणांनी परिसर भक्तिमय झाला होता. दर्शनासाठी भाविकांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या. खासदार संजय पाटील, आमदार सुमन पाटील, शुभूराजे देसाई यांच्यासह अनेकानी रथोत्सवास उपस्थिती लावली. 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Sangliसांगली