शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हलक्यात नाय... दीड टन वजनाच्या गजेंद्र रेड्याचा बर्थ डे हाय; वाढदिवसाची जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 16:22 IST

'असा' आहे त्याचा खुराक 

युनूस शेख

इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने येथे सुरू असलेल्या शिवार कृषी प्रदर्शनात आलेला दीड टन वजनाचा गजेंद्र रेडा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गजेंद्र रेड्याची मोठी चर्चा रंगली आहे ती त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. काल, शुक्रवारी त्याने पाचव्या वर्षात पदार्पण केले. त्याचा जंगी वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याला पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली. इस्लामपुर येथील शासकीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर शिवार कृषी प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनात गजेंद्र रेड्याची हजेरी लागल्याने शेतकऱ्यांची या रेड्याला बघण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे. कृषी प्रदर्शनात सर्वांचे आकर्षण असणारा दीड टन वजनाचा गजेंद्र रेडा. शुक्रवारी पाच वर्षाचा झाला. त्याचा वाढदिवस साजरा केला गेला.

महिलांनी औक्षण केले तर गजेंद्रचा केक स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे, निमंत्रक भागवत जाधव यांनी कापला.  राज्यभरात तो अनेक कृषी प्रदर्शनात गर्दी खेचत असताना त्याच्या वाढदिवसाचा व्हीडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने नागरिक त्याला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करत आहेत.कर्नाटक मधील मुंगसुळी या गावातील विलास नाईक हे पशुपालक शेतकरी या गजेंद्रचे मालक आहे. गजेंद्र त्याच्या वजनासाठी विख्यात आहे. त्याचे सुमारे दीड टन वजन असल्याने गजेंद्र जिथे जातो तिथे त्याचा तोरा कायमच असतो. काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याने या रेड्याला तब्बल ८० लाखांची बोली लावली होती. मात्र या रेड्याच्या मालकाने त्याला विकण्यास मनाई दाखवली.

सध्या गजेंद्र रेड्याला एक कोटीला खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे. परंतु गजेंद्र घरच्या म्हशीची पैदास असल्यामुळे त्याच्या मालकाने त्याला विकण्यास स्पष्ट नकार दिला आहे. गजेंद्र हा मुरा जातीचा रेडा आहे. देशातील अनेक कृषी प्रदर्शनात गजेंद्र रेड्याने हजेरी लावली आहे आणि प्रत्येक कृषी प्रदर्शनात गजेंद्र हा प्रमुख आकर्षणाचा केंद्र ठरत असतो. 'असा' आहे त्याचा खुराक दीड टन वजन आणि एक कोटी रुपयांचा गजेंद्र रेडा आपल्या वजनामुळे आणि किंमतीमुळे जगविख्यात आहे. गजेंद्र याचे वजन ज्याप्रकारे सर्वांना त्याच्याकडे पाहण्यास भाग पाडते अगदी त्याच प्रकारे त्याचा खुराक देखील पाहण्यासारखाच आहे. गजेंद्र एका दिवसात १५ किलो दूध, तीन किलो भरडा, तीन किलो आटा, पाच किलो सफरचंद, याशिवाय ऊस खात असतो.

टॅग्स :Sangliसांगली