सावंतपूर : मदनी चॅरिटेबल ट्रस्टकडून आंधळी (ता. पलूस) येथील कोरोनाबाधित मृत महिलेचे दफनविधी करण्यात आले. याकरिता ग्रामपंचायतीसह नेते मंडळींचे सहकार्य लाभले.
पलूस येथील कोविड सेंटर येथे उपचार घेत असलेल्या आंधळी येथील महिलेचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. मृत्यूनंतर मृतदेह दफन करण्यासाठी आंधळी येथील दफनभूमी येथे आणण्यात आला. मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या पलूस शाखेतील साहिल तापेकरी, हारुण रशीद मुल्ला, हाफिज रशीद मुजावर, दगडू नदाफ, सिकंदर शेख, रहीम मुजावर व मृत महिलेच्या नातेवाइकांनी पीपीई किट, सॅनिटायझरचा वापर करून दफनविधी केला.
यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बजरंग जाधव, अमर मुल्ला, सरपंच अमित चव्हाण, उपसरपंच माणिक माने, विजय पवार, पोपट पाटील, जावेद शिकलगार, अशिद मुल्ला उपस्थित होते.
या कोरोना योद्ध्यांना आंधळी ग्रामपंचायतीच्यावतीने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.