शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांचा संप, मिरजेत निदर्शने 

By अविनाश कोळी | Updated: January 1, 2024 19:15 IST

नवीन‌ कायदा रद्द करण्याची मागणी

मिरज : केंद्र सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी मिरजेतील इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांनी तीन दिवसांचा संप पुकारत निदर्शने केली. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार ट्रकचालकास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंडही आकाराला जाणार आहे. याच कायद्याला देशभरात विरोध होत असून, सोमवारी मिरजेसह जिल्ह्यातील टँकरचालकांनी संपाची हाक दिली.  हा नवीन कायदा रद्द करा, अशी मागणी करत बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल-डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकरचालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे. यासंदर्भात आंदोलकांनी सांगितले की, चालकांना दहा हजार पगार असतो. त्यामध्ये त्यांचे पोट चालत नाही. चालक हा काही मुद्दाम अपघात करत नाही. नैसर्गिकरित्या अपघात होत असतात. पण, अपघात झाल्यानंतर दहा वर्षं कारावास आणि पाच लाख दंड करण्याचा हा कायदा अन्यायी आहे. तो रद्द करावा या मागणीसाठी सोमवारी ७०० पॅट्रोल- डिझेल वाहतुक करणाऱ्या गाड्या बंद आहेत. जवळपास १४०० चालक वाहक संपात उतरले आहेत.३ दिवसांत मागणी मान्य होऊन कायदा‌ रद्द झाला नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा चालक-मालक यांनी दिला आहे. यामुळे जिल्ह्यात पॅट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. निदर्शनावेळी उबेद दर्यावरी, अंकुश गडदे, बापू शिवते, आयाज शेख, फयाज शेख, कल्लाप्पा माळी, सदा कांबळे, अंबर रजपूत, विष्णू सांगोलकर उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीStrikeसंप