शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपी दोन हप्त्यात देण्याच्या हालचाली-:साखर कारखान्यांना हवा केंद्राच्या मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 20:38 IST

साखरेच्या बाजारात मंदी असल्यामुळे एकरकमी एफआरपी देण्यात कारखानदारांना अडचणी असल्याने ती दोन टप्प्यात देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. बहुतांशी कारखाने राष्ट्रवादी व काँग्रेसच्या

ठळक मुद्देशेतकरी संकटात

अशोक डोंबाळे/सांगली : साखरेच्या बाजारात मंदी असल्यामुळे एकरकमी एफआरपी देण्यात कारखानदारांना अडचणी असल्याने ती दोन टप्प्यात देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. बहुतांशी कारखाने राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांच्या ताब्यात असल्यामुळे शासनाकडून त्यांना मदत होत नसल्याचा आरोप होत आहे. एफआरपी दोन टप्प्यात देण्यासही शासनाने परवानगी दिली नसल्यामुळे शेतकऱ्यांची बिले थकीत आहेत. कारखानदार आणि शासनाच्या राजकीय कुरघोड्यांत शेतकरी मात्र संकटात सापडला आहे.

मागील हंगामात देशात ३२० साखर उत्पादन झाले़ एकट्या महाराष्ट्रात १०७ लाख टन उत्पादन झाले होते. यंदा देशात ३५५ लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ११५ लाख टन उत्पादनाचा समावेश असेल. एकूण उठाव लक्षात घेता, १०५ लाख टन साखर शिल्लक राहील. यापूर्वी शासनाने निर्यातीच्या योजना दिल्या़ परंतु, केवळ पाच लाख टन साखर निर्यात झाली. यामुळेच ऊस उत्पादक व साखर उद्योगासमोर संकट आल्याचे कारखानदारांचे मत आहे.

यातून बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने मदत केली पाहिजे, अशीही कारखानदारांची अपेक्षा आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेऊन समस्या मांडल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन मदत करण्याची मागणी केली आहे.

शिवाय एफआरपी दोन हप्त्यात देण्याची कारखानदारांनी विनंती केली आहे. मात्र यावर कोणताच तोडगा निघाला नसल्यामुळे ऊस उत्पादकांची बिले देण्यात अडचणी निर्माण झाल्याचे कारखानदार सांगत आहेत. साखर कारखाने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी करण्यासाठी मदत केली जात नसल्याचा कारखानदारांचा आरोप आहे. या भांडणामध्ये शेतकºयांची दीड महिन्यापासून बिले थकीत आहेत.एकरकमी एफआरपीसाठी शासनाने मदत करावी : अरुण लाडसाखरेचे दर प्रतिक्विंटल २९०० ते ३००० रुपयांपर्यंत आहेत. त्याच्या ८५ टक्के कर्ज बँका कारखान्यांना देत आहेत. तोडणी आणि वाहतूक खर्च, हंगाम सुरु करण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज आदीचा खर्च वजा करता, कारखान्यांकडे प्रतिक्विंटल १९०० ते २००० रुपये शेतकºयांना देण्यासाठी राहत आहेत. यातून एकरकमी एफआरपी कशी देणार? केंद्र आणि राज्य शासनाने मदत केली तरच एकरकमी एफआरपी देणे शक्य आहे. अन्यथा एफआरपी दोन टप्प्यात द्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी दिली.कारखानदारांचा ‘८०:१०:१०’चा फॉर्म्युलाजिल्'ातील साखर कारखानदारांनी एफआरपीच्या ८० टक्के रक्कम लगेच शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्याची तयारी ठेवली आहे. तसेच उर्वरित २० पैकी १० टक्के जून आणि १० टक्के दिवाळीला देण्याच्या फॉर्मुल्यावर साखर कारखानदारांचे बुधवारी एकमत झाले आहे. पण, कारखानदारांचा हा फॉर्म्युला शेतकरी संघटनांना रूचेल का, हा प्रश्न आहे. त्यादृष्टीने संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करूनच ऊस उत्पादकांना बिल देण्याच्या हालचाली सुरू आहेत.चौकटदोन टप्प्यात द्या, पण पैसे शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करा : संजय कोलेशेतकरी अडचणीत सापडला आहे, साखरेचे दर उतरले आहेत, याची कल्पना आहे. परंतु, शेतकºयांच्या कर्जावरील व्याजाचा बोजा वाढत चालला असल्यामुळे कारखानदारांनी दोन टप्प्यात एफआरपी दिली तरी हरकत नाही. पण, तातडीने शेतकºयांच्या खात्यावर पैसे वर्ग केले पाहिजेत. उर्वरित एफआरपीची रक्कमही लगेच जमा केली पाहिजे. साखरेचे दर वाढल्यानंतर एफआरपीवर काही पैसे देण्याचा शब्दही कारखानदारांनी पाळला पाहिजे, अशी प्रतिक्रिया शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्या संजय कोले यांनी दिली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMONEYपैसा