शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

वीज दरवाढीविरोधात मोर्चा

By admin | Updated: December 22, 2016 00:02 IST

इरिगेशन फेडरेशन आक्रमक : ‘महावितरण’च्या कारभाराचा सांगलीत निषेध

सांगली : इरिगेशनच्या शेतीपंपाच्या बिलावर केलेली व्हिलिंग चार्जेसची आकारणी बंद करण्यात यावी, शेतीपंपास मीटर बसविण्यात यावेत, शेतीपंपांच्या मीटरचे रीडिंग घेऊनच वीज बिलांची आकारणी करण्यात यावी, यांसह इतर मागण्यांसाठी बुधवारी राज्य इरिगेशन फेडरेशनच्यावतीने विश्रामबाग येथील ‘महावितरण’च्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चास सुरूवात झाली. महावितरणने व्हिलिंग चार्जेस म्हणून प्रति युनिट ८२ पैसे वाढ लागू केल्याचा निषेध यावेळी करण्यात आला. प्रसंगी आक्रमक भूमिका घेऊन, महावितरणला निर्णय बदलण्यास भाग पाडण्याचा इशाराही कार्यक र्त्यांनी दिला. महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी गावाने एकत्र येऊन लिफ्ट इरिगेशन योजना उभारल्या आहेत. प्रसंगी स्वत:ची जमीन गहाण ठेवून, कर्ज काढून योजनांची उभारणी करण्यात आली आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत असताना, शासनाकडून यास कोणतीही मदत मिळालेली नाही. अशा परिस्थितीत १ जून २०१५ ला वीज बिलात प्रति युनिट ४४ पैशांची वाढ करण्यात आली. यास इरिगेशन फेडरेशनने विरोध केल्यानंतर दर कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले. आता व्हिलिंग चार्जेस म्हणून ८२ पैसे प्रति युनिट वाढ लागू केली आहे. त्यामुळे दुप्पट वीज बिल भरावे लागणार आहे. त्यामुळे इरिगेशन योजना बंद पडणार आहेत. यावेळी अरूण लाड, माजी आ. संजय घाटगे, विक्रांत पाटील, बाबासाहेब पाटील, आप्पासाहेब पाटील, प्रतापराव होगाडे, जे. पी. लाड, आर. जे. तांबे, दिनकर पाटील, अ‍ॅड. सयाजीराव पाटील, अ‍ॅड. अजितराव सूर्यवंशी, तेजस्विनी सूर्यवंशी उपस्थित होते. (प्रतिनिधी)वीज तोडणाऱ्यांचे हात रोखा : एन. डी. पाटीलशेतकरीवर्ग अगोदरच अडचणीत असताना, महावितरणकडून दरवाढ करून अन्याय केला आहे. ही दरवाढ परतवून लावण्यासाठी आक्रमक होण्याची गरज असून, ही लढाई अस्तित्वाची लढाई झाली आहे. उन्हाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने शेतीला पाण्याची गरज निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत वीज कनेक्शन तोडायला येणाऱ्यांचे हात रोखा, असे आवाहन ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी केले. महावितरणला वठणीवर आणण्यासाठी आता मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले पाहिजेत. बहुतांश शेतीपंपांना मीटर बसविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मीटर नाही तर बिल भरणार नाही, अशी भूमिका आता घ्यायला हवी. महावितरणला आपल्या चुका आणि चोऱ्यामाऱ्या थांबविता येत नाहीत. म्हणून त्यांच्याकडून शेतकऱ्यांवर अन्याय सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्याव्हिलिंग चार्जेस आकारणी बंद करा आणि दरवाढ रद्द करा.शेतीपंपास मीटर बसवा, अन्यथा वीज बिलाची आकारणी करू देणार नाही.शेतीपंपांचे मीटर रीडिंग घेऊनच बिलाची आकारणी करावी.वीज बिलाच्या पावत्या शेतकऱ्यांना मिळाल्या पाहिजेत.वीज गळती पूर्णपणे थांबवा, वीज चोरीवर नियंत्रण आणा.