शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत कोरोना रुग्णांवर मोफत उपचारप्रश्नी धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 13:15 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर खासगी रुग्णालयात महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात यावेत, या मागणीसाठी भारतीय ...

ठळक मुद्देसांगलीत कोरोना रुग्णांवर मोफत उपचारप्रश्नी धरणेभाजयुमोचे आंदोलन : जिल्हा प्रशासन, शासनाविरोधात निदर्शने

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर खासगी रुग्णालयात महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात यावेत, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने मंगळवारी सांगलीत धरणे आंदोलन करण्यात आले.

सांगलीतील स्टेशन चौकात भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष दीपक माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. ह्यफसवी योजना जाहीर करणाऱ्या महाविकास आघाडीचा निषेध असोह्ण, अश घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

यावेळी माने म्हणाले की, सरकार एकीकडे सर्व कोरोना रुग्णांवर मोफत उपचाराची घोषणा करीत आहे, तर दुसरीकडे अनेक गोरगरिब रुग्णांना लाखोंची बिले खासगी रुग्णालयात दिली जात आहेत.

कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासूनच सर्वच स्तरातील लोकांचे अर्थकारण बिघडले आहे. लोकांचे रोजगार गेले असून शिल्लक असलेला पैसाही खर्च होत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना कोणतेही वैद्यकीय बिल सोसणार नाही.

गेल्या काही दिवसांपासून सांगली शहरात खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ कोणालाही दिला जात नाही. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक हादरले आहेत. मृतदेह अडविण्याचे प्रकार घडत आहेत. जिल्हा प्रशासनालाही आम्ही याबाबत निवेदन दिले होते.रुग्णांवर मोफत उपचाराचे कोणतेही नियोजन सध्या खासगी रुग्णालयांमध्ये दिसत नाही. ज्यांना शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल व्हायचे आहे त्यांना ती फुल्ल असल्याने खासगी रुग्णालयांचा रस्ता दाखविला जात आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

लवकरात लवकर जिल्हा प्रशासन व शासनाने यात मार्ग काढून रुग्णांवर मोफत उपचार करावेत, अन्यथा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

आंदोलनात राहुल माने, संतोष रुपनर, पिंटू माने, राजू जाधव, अमित भोसले, प्रथमेश वैद्य, शुभम माने, ज्योती कांबळे, चेतन माडगुळकर, प्रवीण कुलकर्णी, सगार खंडागळे, ऋषी माने, राजू माने, जगन्नाथ साळुंखे, प्रतीक पाटील आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :BJPभाजपाSangliसांगली