शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

बारा वर्षांपासून विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन-: गणित-विज्ञान मंडळाचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 23:55 IST

शिराळा तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, दहावीनंतर त्यांना क्षमतेनुसार पुढील क्षेत्रामध्ये प्रवेश घेता यावा यासाठी मोफत मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन तालुका गणित-विज्ञान अध्यापक मंडळामार्फत केले जात आहे

ठळक मुद्दे गुणवत्ता वाढीसाठी धडपड

सहदेव खोत ।पुनवत : शिराळा तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, दहावीनंतर त्यांना क्षमतेनुसार पुढील क्षेत्रामध्ये प्रवेश घेता यावा यासाठी मोफत मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन तालुका गणित-विज्ञान अध्यापक मंडळामार्फत केले जात आहे. हा उपक्रम गेल्या बारा वर्षांपासून सुरू आहे. याचे पालक व विद्यार्थी वर्गातून कौतुक होत आहे.

शिराळा तालुका हा डोंगरी तालुका असला तरी, गुणवत्तेत सरस आहे. तालुक्यात सुमारे ४९ माध्यमिक विद्यालये असून प्रतिवर्षी सुमारे एक हजारहून अधिक विद्यार्थी दहावीची परीक्षा देतात. या विद्यार्थ्यांना सुटीत दहावीच्या विविध विषयांचे सखोल ज्ञान मिळावे, यासाठी तालुका गणित-विज्ञान अध्यापक मंडळ मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करते. गेल्या बारा वर्षांपासून हा उपक्रम विनामूल्य राबविला जात आहे. तालुक्यातील शिक्षकांचे यात योगदान आहे.

गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष अशोक भोईटे, मुख्याध्यापक अमृतकुमार पांढरे, संभाजी पाटील, विज्ञान मंडळाचे बी. आर. पाटील, सुहास दळवी, एस. के. पाटील, आर. एन. जगताप, टी. व्ही. सावंत व अन्य सहकारी शिक्षक रविवारी सुटीच्या दिवशी दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. यात एस. एस. पाटील, एस. एम. पाटील, पी. एम. नाझरे, के. एस. जोशी, एस. एम. दंडगे, ए. एम. हाके, एस. पी. यादव, दयानंद घोडके यांनीही आपला सहभाग नोंदविला आहे. ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. या उपक्रमासाठी शिराळा येथील न्यू इंग्लिश स्कूल प्रशासन व मुख्याध्यापक शिवाजी भोसले यांनी सहकार्य केले आहे. 

शेकडो विद्यार्थ्यांना लाभविद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता व आवडीचे क्षेत्र यांची तपासणी केली जाते. त्यानुसार व्यवसायाबाबत संस्थेचे तज्ज्ञ मार्गदर्शन करतात. याचा लाभ आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना झाला आहे.तालुक्यातील दहावीची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व दहावी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना क्षमतेनुसार चांगल्या क्षेत्रात जाता यावे यासह अनेक विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे. सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक उठाव करत दहावीबरोबरच बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही पुढे शिबिर घेण्याचा मानस आहे.- अशोक भोईटे, अध्यक्ष, गणित अध्यापक मंडळ 

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण