शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: रेवणगावातील भक्तनिवास भाविक, वारकऱ्यांसाठी ठरतेय विसावा केंद्र; मोफत सुविधा उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 16:59 IST

शासकीय, देणगीदार यांच्या कोणत्याही निधीची प्रतीक्षा न करता त्यांनी स्वत:चे लाखो रूपये खर्चून देवस्थान परिसराचा कायापायट

दिलीप मोहिते

विटा : रेवणगाव (ता. खानापूर) येथील तीर्थक्षेत्र श्री वेताळगुरुदेव परिसरात सामाजिक कार्यकर्ते विलास नरसू मुळीक यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या भक्तनिवासामुळे येथे येणारे भाविक आणि पंढरपूरच्या वारकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. येथे भाविकांची राहण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. आषाढी, कार्तिक, माघ तसेच चैत्र महिन्यात पायी दिंडीतून जाणाऱ्या वारकऱ्यांनाही मोफत सोयीसुविधा मिळणार आहेत.विटा शहरापासून १४ किलाेमीटर अंतरावर रेवणगाव येथे तीर्थक्षेत्र श्री वेताळगुरुदेव देवस्थान आहे. या देवस्थान परिसराच्या विकासाचे काम मुळीक करीत आहेत. शासकीय, देणगीदार यांच्या कोणत्याही निधीची प्रतीक्षा न करता त्यांनी स्वत:चे लाखो रूपये खर्चून देवस्थान परिसराचा कायापायट केला आहे.या निसर्गरम्य देवस्थान परिसरात येणारे भाविक व पंढरपूरला पायी दिंडीतून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी तीन मजली टोलेजंग भक्तनिवास बांधले आहे. पहिल्या व दुसऱ्या मजल्यांवर प्रत्येकी सहा म्हणजे १२ खोल्या सर्वसोयीनियुक्त आहेत. तळमजल्यावर सभागृह असून, भाविकांसाठी स्वयंपाक तयार करण्यासाठी एक हजार चाैरस फुटाचे स्वयंपाकगृहही बांधले आहे. त्याचबरोबर प्रत्येकी चार शौचालये व बाथरूम आहेत.पाच हजार चौरस फुटांची इमारत तयारया भक्तनिवासात सर्व भाविक व वारकऱ्यांना राहण्याची मोफत सोय आहे. नुकत्याच झालेल्या आषाढी वारीवेळी मोहित्यांचे वडगाव, पुनवत, रेठरेहरणाक्ष, गगनबावडा, विटा आणि नेर्ले यासह अन्य पायी दिंड्यांतील हजारो वारकऱ्यांनी येथे मुक्काम केला. पाच हजार चाैरस फुटांच्या भक्तनिवासामुळे भाविकांसह वारकऱ्यांची सोय झाली आहे.

टॅग्स :Sangliसांगली