शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ऊस वाहतूकदारांची मुकादमांकडून फसवणूक : आर्थिक फसगत होऊनही दाद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:44 IST

एक तर ऊस तोडणी कामगार मिळत नाहीत आणि जे मिळतात, त्यांच्या मुकादमांना लाखो रुपये देऊनही मजूर ऊस तोडणीसाठी येत नाहीत. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्यांची आणि परिणामी शेतकºयांची

ठळक मुद्देपैसे घेऊनही मजूर नाहीत -वेळप्रसंगी वैयक्तिक मालमत्ताही गहाण ठेवून कर्ज फेडत असतो

आशुतोष कस्तुरे।कुंडल : एक तर ऊस तोडणी कामगार मिळत नाहीत आणि जे मिळतात, त्यांच्या मुकादमांना लाखो रुपये देऊनही मजूर ऊस तोडणीसाठी येत नाहीत. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्यांची आणि परिणामी शेतकºयांची फसवणूक केली जात आहे.

जिल्ह्यात ऊस तोडण्यासाठी जत, उस्मानाबाद, बीड, अहमदनगर, बार्शी, कर्नाटक आदी भागातून मजूर आणले जातात. साधारण प्रत्येक मजुरास ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत आगाऊ रक्कम टोळीच्या मुकादमामार्फत दिली जाते. मुकादम मजुरांना मिळालेली सर्वच रक्कम देतो असे नाही. तो त्याचे कमिशन वजा करून देतो आणि ते मजूर कारखान्यांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी घेतो. त्यामुळे वाहन मालकांना त्याच्यावर विश्वास टाकावा लागतो.

मात्र गेल्या काही वर्षात या मुकादमांनी लाखो रुपये उचल घेऊनही कर्मचारी कारखान्यावर न पोहोचवल्याने, ऊस वाहतूक करणारे धास्तावल्याचे चित्र आजही पाहावयास मिळते. हे पैसे कारखान्याकडून दिले जातात. ऊस गाळपास आणून वाहतूकदार ती उचलीची रक्कम फेडत असतो. मात्र हे कामगारच न आल्याने घेतलेली उचल फेडण्यासाठी घरातील दागिने, वेळप्रसंगी वैयक्तिक मालमत्ताही गहाण ठेवून कर्ज फेडत असतो. यामुळे त्यांना तणावाचा सामना करावा लागतो.

याबाबत पलूस पंचायत समितीचे उपसभापती अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली ऊस वाहतूक संघटनांनी गेल्या काही दिवसांपूर्वी तहसीलदार राजेंद्र पोळ यांना भेटून निवेदन दिले होते. शासनाने मुकादमांची रीतसर नोंदणी शासनदरबारी करून घ्यावी व जेवढ्या कारखान्यांवर ऊस वाहतूकदारांची फसवणूक झाली आहे, त्यांची यादी घेऊन त्यावर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.

कर्नाटक पोलिसांचे असहकार्यज्या लोकांनी ऊस वाहतूकदारांची फसवणूक केली आहे, त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीला (फसवणाऱ्याला) बंदी केले असल्याच्या तक्रारी कर्नाटक पोलिसात दिल्याचे प्रकार पाहावयास मिळत आहेत. कर्नाटक पोलिसांना महाराष्ट्र पोलीस सहकार्य करतात. परंतु कर्नाटक पोलीस महाराष्ट्र पोलिसांना तपासासाठी सहकार्य करत नाहीत.

कर्नाटक पोलिसात संबंधित मुकादमाच्या नातेवाईकांनी मुकादमाला डांबून ठेवल्याची तक्रार दाखल केली आहे. त्याची पडताळणी करण्यास कर्नाटक पोलीस आले होते. पण त्यांना येथे तसा कोणताही प्रकार दिसला नाही. त्यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे दिसते.- जयश्री पाटील, सहायक पोलीस निरीक्षक

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने