शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँकेच्या दिघंचीची शाखेत बनावट खाते उघडून फसवणूक, तत्कालीन शाखाधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 19:30 IST

आटपाडी : दिघंची (ता. आटपाडी) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत बनावट कागदपत्राद्वारे खाते काढून २ लाख ७८ हजार ८७५ ...

आटपाडी : दिघंची (ता. आटपाडी) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत बनावट कागदपत्राद्वारे खाते काढून २ लाख ७८ हजार ८७५ रूपये कर्ज काढून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संशयित दीपक लक्ष्मण चव्हाण (रा. दिघंची), उंबरगाव विकास सोसायटीचा तत्कालीन अध्यक्ष व सचिव, जिल्हा बँकेच्या शाखेचा तत्कालीन शाखाधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संजय मुरलीधर मोरे (वय ३८, रा. तरटीमळा, दिघंची) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जून २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत संशयित दिपक चव्हाण आणि विकास सोसायटीचा अध्यक्ष, सचिव तसेच बँकेचा तत्कालीन शाखाधिकारी यांनी संगनमत करून फिर्यादी संजय मोरे आणि त्यांच्या भावाचे बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड व शेतीचे कागदपत्रे जाेडून, खोट्या सह्या करून उंबरगाव सोसायटीत सभासद नोंदणी केली. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दिघंची शाखेत देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे तसेच दुसऱ्याच कोणाचे तरी फोटो जोडून, खोट्या सहया करून बनावट बँक खाते उघडण्यात आले. या खात्यातून फिर्यादी मोरे व त्यांच्या भावाच्या नावावर कर्ज काढण्यात आले. ही कर्जाची रक्कम संशयित दिपक चव्हाण याने स्वतःच्या ‘इंद्रा ट्रेडिंग कंपनी’च्या आयसीआयसीआय बँकेतील खात्यावर वर्ग करून घेतली. यानंतर फेब्रुवारी २०१९ पर्यंत या कर्जाची परतफेड दाखवण्यासाठी श्री सद्गुरू साखर कारखान्याकडून फिर्यादी मोरे यांना आलेले उसाचे बिल वापरले गेले. प्रत्यक्षात फिर्यादी मोरे यांना उसाच्या बिलापोटी आलेल्या २ लाख ७८ हजार ८७५ रुपयांच्या रकमेचा हिशोब न देता ती रक्कम जिल्हा बँकेच्या शाखेत वर्ग करण्यात आली.फिर्यादी मोरे यांना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पाठपुरावा करून सर्व माहिती संकलित केली. त्यानंतर आटपाडी पोलिस ठाण्यात संशयित चव्हाण, सोसायटीचा तत्कालीन अध्यक्ष व सचिव, बँकेचा तत्कालीन शाखाधिकारी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.