शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील चार हजार एसटी कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत, न्यायालयाच्या आदेशाचेही पालन नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 11:53 IST

बारा ते तेरा तास काम करूनही पगार मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी

सांगली : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या जिल्ह्यातील चार हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पगार गेल्या चार महिन्यांपासून वेळेवर होत नाहीत. त्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या महिन्यात देखील १६ तारीख आली तरी कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत. न्यायालयाने कर्मचाऱ्यांचे पगार १० तारखेच्या आत करण्याचे आदेश दिले आहेत. तरी देखील त्याचे पालन होत नाही. त्यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस बजावली आहे.आर्थिक अडचणीमुळे कवठेमहांकाळ आगारातील चालक भीमराव सूर्यवंशी यांनी बुधवारी आत्महत्या केली आहे. अशा घटनेनंतर तरी एसटी महामंडळ आणि शासनाला जाग येणार आहे का, असा सवाल संतप्त कामगारांनी बुधवारी केला. गेल्या चार महिन्यात एसटी कामगारांचे पगार वेळेवर होत नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दैनंदिन खर्च भागवितानाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बारा ते तेरा तास काम करूनही पगार मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. न्यायालयाने महिन्याच्या १० तारखेच्या आत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला पाहिजे, अशी सूचना शासन आणि एसटी महामंडळ प्रशासनाला दिला आहे. न्यायालयाच्या आदेशाचेही शासनाकडून पालन होत नसल्याबद्दल एसटी कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.म्हणूनच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांना महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने वेळेत पगार होण्याबाबत नोटीस बजावली आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाचेही पालन झाले पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत झालेच पाहिजे : अशोक खोतएसटी महामंडळाचे कर्मचारी सध्या एसटी फायद्यात आणण्यासाठी बारा ते तेरा तास राबत आहेत. या कर्मचाऱ्यांना शासनाने वेळेवर पगार देऊन प्रोत्साहन दिले पाहिजे. पण, गेल्या तीन ते चार महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांचे पगारच वेळेवर होत नसल्यामुळे कर्मचारी आर्थिक अडचणीत आहेत. एसटी महामंडळाने तातडीने पगार देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीST Strikeएसटी संप