शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरातील आणखी चार टोळ्या ‘मोक्का’च्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 20:46 IST

शहरातील २ गुंडांच्या टोळ्यांना ‘मोक्का’ लावल्यानंतर अजून ४ टोळ्या या कारवाईच्या रडारवर आहेत. आता तडीपारीसारखी कारवाई न करता आर्थिक लाभ आणि वर्चस्ववादासाठी सावकार आणि भूखंड माफियांनी एक जरी गुन्हा केला तरी, त्यांच्या चुकीला क्षमा नाही.

इस्लामपूर : शहरातील २ गुंडांच्या टोळ्यांना ‘मोक्का’ लावल्यानंतर अजून ४ टोळ्या या कारवाईच्या रडारवर आहेत. आता तडीपारीसारखी कारवाई न करता आर्थिक लाभ आणि वर्चस्ववादासाठी सावकार आणि भूखंड माफियांनी एक जरी गुन्हा केला तरी, त्यांच्या चुकीला क्षमा नाही. पोस्टरवरील गुंडाराज आणि आता मोक्काबरोबरच झोपटपट्टीदादा कायद्याची कठोर अंमलबजावणी करुन वाळवा—शिराळ्यातील गुंडांच्या टोळ्या नेस्तनाबूत करणार असल्याचा इशारा पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिला.

येथील उपअधीक्षक कार्यालयात पिंगळे यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच पत्रकार बैठकीत आपल्या कामाची दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले, पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर येथील गुंडांच्या कुंडल्या काढल्या असता, परिस्थिती फारच भयानक असल्याचे निदर्शनास आले. सोन्या शिंदे आणि अनमोल मदने गँगला मोक्का लावल्यानंतर या टोळ्यांचे कारनामे समोर येऊ लागले आहेत. त्यांनी येथील व्यापाऱ्यांना ५ लाखापासून १५ लाखांपर्यंत लुबाडल्याचे चौकशीत स्पष्ट होत आहे.

पिंगळे म्हणाले, यापुढे पोस्टरवरील गुंडाराज संपुष्टात आणू. नगरपालिका, ग्रामपंचायती आणि पोलिसांची नाहरकत असल्याशिवाय कुठेही पोस्टर लागू देणार नाही. बेकायदा पोस्टर लावल्यास जागा देणारा आणि पोस्टरची छपाई करणारांनाही सहआरोपी केले जाईल. मोक्का कारवाईतील गुंडांना आश्रय देऊन त्यांना मदत करणाºया मास्टरमार्इंडवरही कारवाई होईल.संघटित गुन्हेगारीसह सावकारी आणि भूखंड माफियांवरही लक्ष केंद्रित करणार आहोत. इस्लामपूर पोलीस उपविभागातील समाजजीवन आणि महिला—मुलींच्या संरक्षणाबाबत प्राधान्य देणार आहोत. चूक करणाºयाला माफी नाही, या पध्दतीने काम करताना कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नसल्याचे पिंगळे यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक (मोक्का) कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एखाद्या टोळीविरुध्द गंभीर गुन्'ासाठी किमान २ आरोपपत्र न्यायालयात दाखल होणे आवश्यक आहे. सोन्या शिंदे गँगची कुंडली काढल्यानंतर, त्याच्या टोळीविरुध्द खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, रॉबरी आणि अपहरणाचे २६ गुन्हे नोंद असल्याचे समोर आले. या टोळीविरुध्द तब्बल २१ आरोपपत्रे न्यायालयात दाखल झाली आहेत. ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर मोक्काचे प्रस्ताव तयार केले. या सर्वांची रवानगी येरवडा कारागृहात होईल.

 

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी