शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत मोटारीची काच फोडून चार लाखांची रोकड लंपास

By शरद जाधव | Updated: November 29, 2022 21:11 IST

विश्रामबाग येथील प्रकार; पाळत ठेवून चोरट्यांकडून डल्ला

सांगली : शहरातील विश्रामबाग येथील शंभरफुटी रस्त्यावर लावलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी तीन लाख ९० हजार रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी अमोल अशोक चौगुले (रा. बिरनाळे शाळेजवळ, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.

फिर्यादी चौगुले यांचा संगणक विक्रीचा व्यवसाय असून, मंगळवारी सकाळी व्यावसायिक कारणासाठी शिरोळ येथील बँकांतून त्यांनी तीन लाख ९० हजार रुपयांची रोकड काढली होती. यानंतर त्यांनी ही रक्कम चालकाशेजारी असलेल्या डिक्कीत ठेवली होती. चौगुले व त्यांचा चालक दोघे शिरोळ येथून सांगलीत आले व शंभरफुटी रस्त्यावरील एका हॉटेलसमोर मोटार लावून ते कामासाठी जवळच गेले होते.

नेमकी याचीच संधी साधत चोरट्यांनी सुरुवातीला मोटारीच्या पाठीमागील काच फोडण्याचा प्रयत्न केला. ती न फुटल्याने त्यांनी डाव्या बाजूच्या दरवाजाची काच फोडली व त्यानंतर डिक्कीचे लॉक तोडून आतील रोकड लंपास केली. थोड्या वेळानंतर चौगुले व त्यांचे चालक अरुण हडपद मोटारीजवळ आल्यानंतर त्यांना काच फुटल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर डिक्कीतील रोकडही लंपास झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ विश्रामबाग पोलिस ठाण्यात येत फिर्याद दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी करत तपास सुरू केला आहे.चौकट

पाळत ठेवूनच डल्लाशिराेळ येथे बँकेतून पैसे काढल्यापासूनच दोन तरुण त्यांच्या मागावर असल्याची शक्यता आहे. चालक हडपद यांनीही पोलिसांना याबाबतची माहिती दिली. गेल्याच आठवड्यात आष्टा येथेही अशाच प्रकारे मोटारीची काच फोडून रोकड लंपास करण्यात आली होती.

 

टॅग्स :Sangliसांगली