शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कडेगाव, पलूसचे चार ग्रामसेवक निलंबित; सांगली जिल्हा परिषदेची कारवाई, कारण काय..

By अशोक डोंबाळे | Updated: November 2, 2023 18:02 IST

'या' ग्रामपंचायतींची होणार चौकशी

सांगली : ग्रामपंचायतीच्या कामकाजात हालगर्जीपणा आणि पंधराव्या वित्त आयोगातील निधी खर्चाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी कडेगाव, पलूस तालुक्यातील चार ग्रामसेवक निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये कडेगाव तालुक्यातील वडियेरायबाग, तुपेवाडी, येतगाव आणि पलूसचे एक अशा चार ग्रामसेवकांना निलंबित केले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींकडे जवळपास २०० कोटी रुपयांचा पंधरा वित्त आयोगाचा निधी अखर्चीत आहे. निधी असूनही विकास कामे होत नाहीत, अशा तक्रारी लोकप्रतिनिधींच्या होत्या. तक्रारींची गंभीर दखल घेऊन मुुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, मुख्य वित्त व लेखाधिकारी विठ्ठल चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, प्रमोद काळे यांच्या उपस्थितीमध्ये पलूस, कडेगाव तालुक्यांमधील ग्रामपंचायतींच्या निधी खर्चाचा आढावा दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी झाला. या आढावा बैठकीत वडिये रायबाग येथील ग्रामसेविका मुल्ला, तुपेवाडी ग्रामसेवक डी. बी. साठे, येतगावचे ग्रामसेवक रमेश धाबेकर, पलूस तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी लकप्पा आमशिद सनदी यांनी वित्त आयोगाचा निधी खर्चाकडे दुर्लक्ष केले आहे, तसेच ग्रामपंचायतीच्या कामकाजाकडे लक्ष दिले नसल्याचा प्रशासनाने ठपका ठेवला आहे. त्यानुसार वरील चार ग्रामसेवकांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे.

या ग्रामपंचायतींची होणार चौकशीकडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे, मोहिते वडगाव, तुपेवाडी या ग्रामपंचायतींच्या कारभाराबद्दल तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीनुसार ग्रामपंचायतीच्या सर्व कारभाराची चौकशी करून दोषींवर आरोप निश्चित करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती तृप्ती धोडमिसे यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद