शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चार मुले, तरीही आई-वडिलांची इच्छा मरणासाठी दया याचना; सांगली जिल्ह्यातील प्रकार

By संतोष भिसे | Updated: December 21, 2023 17:01 IST

आटपाडी : पोटाला चिमटे घेऊन चार मुलांचे संगोपन करत त्यांना मोठे केले ते संसारात रममाण झाल्याने आम्हाला सांभाळत नाहीत. ...

आटपाडी : पोटाला चिमटे घेऊन चार मुलांचे संगोपन करत त्यांना मोठे केले ते संसारात रममाण झाल्याने आम्हाला सांभाळत नाहीत. वृद्धापकाळाने निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्येला तोंड देणे अशक्य बनले आहे. जेष्ठ नागरिक कायद्यातर्गत न्याय द्यावा अन्यथा आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी आर्त विनवणी आटपाडी तालुक्यातील विठ्ठलापूर गावचे सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग दीक्षित व त्यांची पत्नी शालन यांनी केली आहे. याबाबात तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.विठ्ठलापूर येथील पांडुरंग विष्णू दीक्षित (वय ७९) हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. तर पत्नी शालन दीक्षित याचे वय ७७ आहे. त्यांना सुजित, संजय, सतीश, प्रवीण अशी चार मुले आहेत. मात्र ते आम्हाला सांभाळत नाहीत. मुलांनी आम्ही राहत असलेल्या घरातून हाकलले आहे. पत्नी शालन यांचे हात व पाय मोडले आहेत. त्यांना हाताने कोणतेही काम करता येत नाही. तर पांडुरंग यांना पाठीचा व हृदयाचा आजार आहे. वृद्धापकाळात विविध व्याधींनी त्रस्त असल्याने जगणे मुश्कील बनले आहे. इच्छामरणास परवानगी मिळावी आणि बेघर केल्याबद्दल जेष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :Sangliसांगली