शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरातील मारहाण प्रकरण राजकीय भूमिकेच्या संशयातूनच, नगरपालिका निवडणुकीआधीच धुमशान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 12:55 IST

अलीकडील दोन वर्षांत नगरसेविका शिंदे यांच्या राजकीय भूमिका संशयास्पद होत्या. त्यामुळे त्यांचे पती विजयकुमार शिंदे यांना मारहाण झाल्याची चर्चा

अशोक पाटीलइस्लामपूर : नगरपालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार आणि प्रतिभा शिंदे एकाच प्रभागातून विजयी झाले. यामागे पवार यांची मोठी ताकद होती. अलीकडील दोन वर्षांत नगरसेविका शिंदे यांच्या राजकीय भूमिका संशयास्पद होत्या. त्यामुळे त्यांचे पती विजयकुमार शिंदे यांना मारहाण झाल्याची चर्चा आहे. यातून शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात संघर्षाची ठिणगी पडली आहे.

विकास आघाडीत शिवसेनेचा स्वतंत्र गट होता. पालिकेत शिवसेनेचे पाच नगरसेवक होते. त्यात प्रतिभा शिंदे यांचा समावेश होता. त्यांना पालिकेत निवडून आणण्यासाठी जिल्हाप्रमुख पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. अलीकडे प्रतिभा शिंदे यांचा कल राष्ट्रवादीकडे झुकल्याचा संशय शिवसेनेला होता. शिवसेनेने इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर नामकरण करण्याची भूमिका घेतली होती. यासाठी लोकांच्या सह्यांची मोहीम राबविली. पालिकेत नामांतराचा ठराव संमत करण्यासाठी प्रयत्न केले. ज्या दिवशी हा ठराव सभागृहात ठेवण्यात आला, त्यावेळी प्रतिभा शिंदे गैरहजर राहिल्याचा रागही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना होता.शिवसेनेतील बंडानंतर आनंदराव पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यावेळी पालिकेतील पाचही नगरसेवकांना मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी आमंत्रित केले होते; परंतु प्रतिभा शिंदे अनुपस्थित राहिल्या. याचाही राग काहींना होता. यातूनच ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. पालिका निवडणुकीआधीच धुमशान सुरू झाले आहे.

शिंदेंचा सर्वपक्षीय नेत्यांशी संपर्क

प्रतिभा शिंदे यांचे बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे संघटन आहे. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांचे पती विजयकुमार शिंदे बांधकाम व्यावसायिक आहेत. सर्वच पक्षांतील नेत्यांशी त्यांचा संपर्क आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर त्यांची ऊठ-बस शिवसेनेला रुचली नसल्याची चर्चा आहे.

प्रतिभा शिंदे यांच्या पाठीशी शिवसेना असतानाही त्यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. यासाठी काही अर्थपूर्ण व्यवहार केल्याची चर्चा आमच्या कानावर आली. मारहाणीचा तपास करून पोलीस करतीलच. यामध्ये काही राजकारण नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिभा शिंदे यांना छुपा पाठिंबा देऊन आम्हाला अडकविण्याची खेळी केली आहे. जयंत पाटील यांनी शहरातील शिवसेना संपविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. - आनंदराव पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना शिंदे गट

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरShiv Senaशिवसेना