शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली रेल्वे स्थानकावरील पुलाचा प्रश्न रेल्वे मंत्र्यांच्या दरबारी, माजी रेल्वे मंत्र्यांकडून दखल 

By अविनाश कोळी | Updated: December 25, 2023 16:19 IST

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे हा प्रश्न सोडविण्याची विनंती केली 

सांगली : सांगलीरेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ व ५ वरील प्रवाशांसाठी तसेच मालधक्क्यापर्यंत पूल नसल्यामुळे प्रवासी, रेल्वे कर्मचारी व हमालांच्या गैरसोयीच्या प्रश्नावर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला होता. रेल्वे प्रवासी ग्रुपने या बातमीच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केल्यानंतर माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी त्याची दखल घेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे हा प्रश्न सोडविण्याची विनंती केली आहे.सांगली स्थानकावर गतिशक्ती योजनेंतर्गत १२ कोटी रुपये खर्चून नवीन पूल बांधण्यात येणार आहे. पण हा पूल मालधक्क्याला जोडण्यात येणार नाही, असा खुलासा रेल्वे प्रशासनाने माहिती अधिकारांतर्गत पत्रव्यवहारात केला आहे. याच स्थानकावर प्रवासी गाड्यांसाठी बांधण्यात आलेल्या नवीन प्लॅटफाॅर्म क्र. ४ लाही पादचारी पूल मिळणार नाही, असेही प्रशासनाने म्हटले आहे. नवा पूल फक्त प्लॅटफाॅर्म क्रमांक १, २ व ३ लाच जोडला जाईल. त्यामुळे नव्या प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना प्लॅटफॉर्म पहिल्या तीन फलाटांवर येताच येणार नाही. त्यांना रूळ ओलांडावा लागेल.सांगली स्थानकाच्या मालधक्क्यासाठी पादचारी पूल नसल्याने सध्या हमालांना रेल्वे रूळ ओलांडणे हाच पर्याय समोर उरतो. देशात सर्व स्थानकांवर प्लॅटफाॅर्म एकवरून मालधक्क्यापर्यंत पादचारी पूल आहेत. मात्र, सांगलीला नाही. याबाबत ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचा दाखला देत रेल्वे प्रवासी ग्रुपने सोशल मीडियावर मध्य रेल्वे प्रशासनासमोर प्रश्न उपस्थित केला. माजी रेल्वे मंत्री प्रभू यांनी संघटनेचे हे ट्विट केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे फाॅरवर्ड केले व या प्रश्नाची सोडवणूक करण्याची विनंती केली. प्रवासी संघटनेने याबाबत प्रभू यांना धन्यवाद दिले. रेल्वेने हा प्रश्न साेडवला नाही, तर त्यासाठी आंदोलनाची तयारीही संघटनेने केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे