शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
2
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
3
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
4
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
5
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
6
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
7
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
8
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
9
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
10
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
11
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
12
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
14
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
15
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
16
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
17
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
18
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
19
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
20
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना

माजी आमदार हाफिज धत्तुरे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 01:03 IST

मिरजेचे माजी आमदार हाफिज धत्तुरे (वय ७७) यांचे मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने येथील वॉन्लेस रूग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. 

मिरज : मिरजेचे माजी आमदार हाफिज धत्तुरे (वय ७७) यांचे मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने येथील वॉन्लेस रूग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास धत्तुरे यांना घरात हृदयविकाराचा धक्का बसला होता. उपचारासाठी त्यांना तातडीने वॉन्लेस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर डॉ. रियाज मुजावर, डॉ. शिरीष पारगावकर, डॉ. सुबोध धनवडे यांनी तातडीची एन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली होती. तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. धत्तुरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्यासह नगरसेवक, नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. माजी आमदार हाफिज धत्तुरे यांची ‘आम आदमी’ (सामान्य माणूस) अशी मिरज परिसरात ओळख होती. राजकारणात येण्यापूर्वी त्यांचा बेकरीचा व्यवसाय होता. नगरपालिकेच्या निवडणुकीपासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असताना, ते दोन वेळा मिरज विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यांना १९९९ मध्ये सिनेअभिनेते दिलीपकुमार व शब्बीर अन्सारी यांच्या प्रयत्नाने आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना व काँग्रेसच्या आघाडीकडून मिरज विधानसभा मतदार संघासाठी पहिल्यांदा उमेदवारी मिळाली. त्यावेळी राजकारणात फारसे परिचित नसलेले धत्तुरे अचानक उमेदवारी मिळूनही निवडून आले. त्यानंतर २००५ मध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यांनी दहा वर्षाच्या कालखंडात सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आमदारकी पणाला लावली. महापालिकेच्या निर्मितीनंतर त्यांनी स्वतंत्र नगरपालिका व्हावी यासाठी व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आंदोलनेही केली. मिरजेतील अतिक्रमणे हटविताना त्यांनी खोकीधारकांची बाजू घेतली. खोकीधारकांचे प्रथम पुनर्वसन करा, मगच खोकी हलवा अशी मागणी करीत त्यांनी अतिक्रमण हटविणाऱ्या जेसीबी यंत्रासमोर आडवे पडत अतिक्रमण हटाव मोहिमेला जोरदार विरोध केला होता. आमदारकीच्या कारकीर्दीत त्यांनी विकासात्मक कामांनाही प्राधान्य दिले. अनेक गोरगरिबांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडविण्यासाठी त्यांची सातत्याने धडपड होती. आमदार असूनही साधी राहणी असलेले माजी आ. हाफिज धत्तुरे यांची नागरिकांत ‘आम आदमी’ अशीच ओळख होती. धत्तुरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा माजी नगरसेवक आलम धत्तुरे, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :Sangliसांगली