शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

माजी संचालकांची याचिका सहकार विभागाने फेटाळली

By admin | Updated: April 10, 2015 00:33 IST

जिल्हा बँक : उच्च न्यायालयातील सुनावणी शुक्रवारी

सांगली : सहकार विभागाने केलेल्या कारवाईविरोधात जिल्हा बॅँकेच्या १७ माजी संचालकांनी केलेले अपील गुरुवारी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फेटाळले. त्यानंतर उच्च न्यायालयात याच प्रकरणावरील याचिकेवर सुनावणी झाली. शुक्रवारी न्यायालयात अंतिम निर्णय होईल, अशी माहिती याचिकाकर्ते प्रा. सिकंदर जमादार यांनी दिली. दरम्यान, जिल्हा बॅँक निवडणुकीतील छाननीची प्रक्रिया पार पडली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अपात्र ठरलेल्या माजी संचालकांबाबत काय निर्णय होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा बॅँकेतील २००१-२००२ ते २०११-१२ या कालावधित झालेल्या ४ कोटी १८ लाख १६ हजारांच्या गैरव्यवहारप्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे. महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० मधील कलम ८३ नुसार झालेल्या चौकशीमध्ये गैरव्यवहार स्पष्ट झाला आहे. याप्रकरणी तत्कालीन ४० माजी संचालकांकडून लेखापरीक्षण शुल्काचे २० हजार रुपये वसुलीचे आदेश सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांनी दिले आहेत. प्रत्येकी ४२६ रुपये जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या कारवाईमुळे माजी संचालकांना जिल्हा बॅँकेची निवडणूक लढविणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या कारवाईविरोधात १७ माजी संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याच याचिकेवर शुक्रवारी निर्णय होणार आहे.याप्रकरणी माजी संचालकांनी सहकारमंत्र्यांकडेही अपील केले होते. त्यावर गुरुवारी दुपारी सुनावणी झाली. सहकारमंत्र्यांनी माजी संचालकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर स्थगितीची मागणी करणारे अपील फेटाळले. त्यानंतर लगेचच उच्च न्यायालयातील सुनावणीसाठी संचालक हजर झाले. गुरुवारी सरकारतर्फे बाजू मांडणाऱ्या वकिलांनी, निकालपत्राचा अभ्यास करून युक्तिवाद करावा लागणार असल्याने थोडा अवधी हवा असल्याचे सांगितले. त्याचवेळी सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात येणार असेल, तर जिल्हा बॅँक निवडणुकीच्या छाननीस आणखी काही काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी माजी संचालकांनी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य केली नाही. शुक्रवारी याबाबतची सुनावणी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)उमेदवारी अर्जांचे काय होणार?एकीकडे उमेदवारी अर्ज अवैध ठरविले जाऊ नयेत, या उद्देशाने माजी संचालकांनी याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे अर्जांची छाननी प्रक्रिया गुरुवारी पार पडली. आता न्यायालयीन निकालानंतर जिल्हा बँकेसाठी अर्ज दाखल केलेल्या माजी संचालकांच्या अपात्रतेविषयी निवडणूक निर्णय अधिकारी नेमका कोणता निर्णय घेणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.