सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील १५७ कोटींच्या घोटाळा प्रकरणात माजी संचालकांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी गुरुवारी ८ आॅक्टोबर रोजी होत असून, न्यायालय याप्रकरणी निर्णय घेण्याची चिन्हे दिसत आहेत. न्यायालयीन निकालावर याप्रकरणी आरोपपत्रावरील चौकशी अवलंबून असल्याने सर्वांचेच लक्ष उच्च न्यायालयातील निर्णयाकडे लागले आहे. जिल्हा बॅँकेतील १५७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांनी ९६ पानी आरोपपत्र गत महिन्यात दाखल केले आहे. माजी संचालक, तत्कालीन अधिकारी, मृत संचालकांचे वारसदार अशा शंभरजणांचा यात समावेश आहे. याप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी लेखी अथवा तोंडी म्हणणे पुराव्यासह सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पहिल्या सुनावणीवेळी तत्कालीन दोन संचालक, दोन वारसदार, एक कार्यकारी संचालक व दोन व्यवस्थापक अशा सातजणांनी चौकशी अधिकाऱ्यांसमोर म्हणणे सादर केले. नऊजण सुनावणीला गैरहजर राहिले. ८४ लोकांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ मागितली. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल असून, त्यावर सुनावणी होणार असल्याने सुनावणीनंतरची तारीख म्हणणे मांडण्यासाठी मिळावी, अशी मागणी यातील बहुतांश माजी संचालकांनी चौकशी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार चौकशी अधिकाऱ्यांनी ६ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती.मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी याप्रकरणी सुनावणी झाली असली, तरी न्यायालयाने यासंदर्भातील पुढील सुनावणी ८ आॅक्टोबर रोजी ठेवली. माजी संचालकांनी चौकशी अधिकाऱ्यांची सुनावणी ६ आॅक्टोबरला असल्याने त्यापूर्वी न्यायालयाने याप्रकरणी निर्णय घ्यावा, अशी विनंती केली होती. न्यायालयाने याचिकेवरील निर्णय झाल्याशिवाय चौकशी अधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय घेऊ नये, अशी सूचना केली होती. (प्रतिनिधी)सुनावणी लांबवणीवरन्यायालयीन आदेशाबाबत चौकशी अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असेही सांगितले. त्यामुळे आरोपपत्रासंदर्भातील सुनावणीही १६ आॅक्टोबरपर्यंत लांबणीवर गेली आहे. न्यायालयाचा निर्णय झाल्याशिवाय चौकशी अधिकाऱ्यांना काहीच करता येणार नसल्याचे सांगण्यात आले.
बँकेच्या माजी संचालकांच्या
By admin | Updated: October 8, 2015 00:58 IST