शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दंगली रोखण्यासाठी सांगलीत सर्वधर्मीय समित्यांची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 15:37 IST

धार्मिक सलोखा राखण्यासाठी सर्वधर्मीय बैठक

सांगली : काही विघ्नसंतोषी लोकांकडून सतत जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वधर्मीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या समित्या स्थापन करून असे डाव हाणून पाडण्यात येतील, असा निर्धार सांगलीतील बैठकीत करण्यात आला.सांगलीच्या वृत्तपत्र विक्रेता भवनात बुधवारी सर्वधर्मीय कार्यकर्त्यांची, नागरिकांची बैठक पार पडली. निमंत्रक सतीश साखळकर यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून सांगली, मिरजेसारख्या शहरात दंगली घडविण्यासाठी काही विघ्नसंतोषी लोक प्रयत्न करीत आहेत. जातीय, धार्मिक तेढ वाढेल, अशी वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे हा डाव ओळखूनच तो हाणून पाडण्यासाठी तसेच धार्मिक सलोखा राखण्यासाठी सर्वधर्मीय बैठक बोलावली आहे.  सांगली, मिरजेत सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असताना हा सलोखा बिघडविण्यासाठी काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत. त्यांना रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.बैठकीस गौतम पवार, पृथ्वीराज पवार, ॲड. अमित शिंदे, नगरसेवक मंगेश चव्हाण, अभिजित भोसले, तौफिक शिकलगार, रवींद्र शिंदे, युनूस महात, फिरोज पठाण, चंदन चव्हाण, शंभुराज काटकर, डॉ. संजय पाटील,   प्रा. रविंद्र ढाले, रेखा पाटील, रजाक नाईक, ताजुद्दीन शेख, आयुब बारगीर, जसबीर कौर, तोहिद मुजावर आदी उपस्थित होते.कार्यकर्त्यांची जबाबदारी अधिकसामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की, असे प्रकार रोखण्यासाठी शहरातील सर्वच पक्षांच्या प्रमुख राजकीय पक्षांची जबाबदारी अधिक आहे. त्यांनी चुकीचा प्रकार घडल्यास त्याची माहिती द्यावी.बैठकीतील निर्णय

  • सर्वधर्मीय कार्यकर्त्यांच्या समित्या विविध भागांमध्ये स्थापन हाेणार
  • सामाजिक सलोखा राखण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार
  • सण, उत्सवातील शांततेसाठी प्रयत्न करण्यात येणार
  • पोलिस व प्रशासनास समित्या सहकार्य करण्यासाठी अग्रेसर राहतील
टॅग्स :Sangliसांगली