शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: चांदोली व्याघ्र प्रकल्पाजवळ जंगलात पुन्हा आग, औषधी वनस्पतीसह सागवान वृक्ष जळून खाक 

By श्रीनिवास नागे | Updated: March 20, 2023 14:36 IST

वन विभागाचे कर्मचारी संपावर असल्यामुळे वणव्याची दाहकता वाढून संपूर्ण अभयारण्य आगीत सापडण्याची शक्यता

शिराळा : चांदोली (ता. शिराळा) अभयारण्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पानजीक मणदूर गावच्या हद्दीत जंगलाला अचानक वणवा लागल्याची घटना घडली. यामध्ये अनेक औषधी वनस्पतीसह किमती सागवान वृक्ष जळून खाक झाले. वन विभागाचे कर्मचारी संपावर असल्यामुळे वणव्याची दाहकता वाढून संपूर्ण अभयारण्य आगीत सापडण्याची शक्यता आहे.काल रविवारी (दि. १९) दुपारी अचानक वणवा लागल्याने परिसरातील अनेक वन्य प्राण्यांचाही जीव धोक्यात आला. दुपारच्या सुमारास हा वणवा लागल्याची घटना घडली. दरम्यान, आगीची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग मोठी असल्यानं नियंत्रण मिळवता आले नाही. अशाच पद्धतीने दि. ७ मार्चला आग लागली होती.वन विभागाचे कर्मचारी संपावर असल्यामुळे वणव्याची दाहकता वाढून संपूर्ण अभयारण्य आगीत सापडण्याचा धोका आहे. दरम्यान, चार रोजंदार वनमजूर ही आग शमविण्यासाठी कार्यरत होते. ही आग अशीच उशिरापर्यंत सुरू राहिली तर जंगलातील अनेक झाडांचे नुकसान होऊ शकते. तसेच वन्यप्राण्यांच्या जीवालाही धोका आहे.मानवी हस्तक्षेप कारणीभूतएकीकडे जंगलात लागणाऱ्या आगीवर उपाययोजना करायची नाही, तर दुसऱ्या बाजूला पावसाळ्यात लाखो रुपये खर्च करून वृक्ष संवर्धन व वृक्षारोपण कार्यक्रम राबवायचा, याला काहीच अर्थ नसल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे आहेत तीच जंगले वाचविली तरी सध्या भेडसावणाऱ्या समस्या दूर होतील, तर मानवी हस्तक्षेपामुळे वणवे लागण्याचे प्रकार अधिक असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.

टॅग्स :Sangliसांगलीfireआगforest departmentवनविभाग