शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

शिगावमधील तरुणाने पिकवली परदेशी भाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 01:07 IST

वयाच्या १७ व्यावर्षी कौस्तुभने डिप्लोमा इन टेक्स्टाईलचे शिक्षण घेत असताना, सावर्डे (ता. हातकणंगले) गावच्या नातेवाईकांची विदेशी भाजीपाल्याची शेती पाहिली आणि आपण अशापद्धतीने पीक घेऊ शकतो, या जिद्दीने त्याने विदेशी पालेभाज्यांविषयी अभ्यास केला.

ठळक मुद्देनव्या शेतीचा ध्यास। उच्चशिक्षित कौस्तुभ बारवडेचा शेतकऱ्यांपुढे आदर्श, शेती व्यवसाय फायद्यात

विनोद पाटील।शिगाव : कष्ट आणि नवनिर्मितीच्या ध्यासाने शिगाव (ता. वाळवा) येथील कौस्तुभ बारवडे हा उच्चशिक्षित तरुण परदेशी भाजीपाला पिकवत आहे. वारणा काठावरील ऊस या हुकमी पिकापेक्षाही अधिक उत्पन्न घेता येऊ शकते, हे त्याने या प्रयोगातून दाखवून दिले आहे.वयाच्या १७ व्यावर्षी कौस्तुभने डिप्लोमा इन टेक्स्टाईलचे शिक्षण घेत असताना, सावर्डे (ता. हातकणंगले) गावच्या नातेवाईकांची विदेशी भाजीपाल्याची शेती पाहिली आणि आपण अशापद्धतीने पीक घेऊ शकतो, या जिद्दीने त्याने विदेशी पालेभाज्यांविषयी अभ्यास केला. या पिकासाठी लागणारा हंगाम, येणारा खर्च, लागवड तंत्रज्ञान व बाजारपेठेचा अभ्यास करून गेल्यावर्षी त्याने वडील राजेंद्र बारवडे, चुलते सुकुमार बारवडे यांच्या सहकार्याने चेरी टोमॅटो, झुकेनी, रेड कॅबेज, ब्रोकोली यासारख्या विदेशी भाजीपाल्याची लागवड केली. त्यातून त्याने एक एकरात वर्षात आठ लाखांची उलाढाल केली होती.

यावर्षी त्याने झुकेनी, पॉपचाई या विदेशी भाजीपाल्याची लागवड केली आहे. झुकेनीला वार्षिक सरासरी भाव २५ ते ३५ रुपये मिळतो. त्याने काही व्यापाऱ्यांशी वर्षभराचे कंत्राट करून ३५ रुपये कायमचा भाव ठरवला आहे. त्यामुळे दर चांगला मिळायला मदत होते.

बेसिलचा सुगंध चांगला आहे. त्यामुळे हर्बल टी तयार करण्यासाठी त्याची पाने वापरली जातात. अन्य भाज्यांमध्ये आस्वाद घेण्यासाठीदेखील याचा वापर केला जातो. परदेशी भाजीपाला या भागात पहिल्यांदाच असल्याने त्यांना अधिक ज्ञान नव्हते. लागवडीपासून ते काढणीपर्यंत माहिती नव्हती. नातेवाईकांकडून माहिती करून घेतली व मजुरांनाही प्रशिक्षण दिल्यामुळे मजूरही काम चांगल्या पद्धतीने करू लागले. उत्पादित माल मुंबई, पुणे, गोवा, हैदराबाद या ठिकाणी पाठवतात, तसेच पंचतारांकित हॉटेल्समध्येही या मालाला मागणी असते.तरुणांनी शेतीकडे वळावेनोकरीच्या मागे न लागता युवा पिढीने शेती व्यवसायाकडे वळायला हवे. योग्य नियोजन, बाजारात कशाची मागणी आहे, याचा अभ्यास करून शेती केल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होतो. तरुण शेतकरी बांधवांना कोणतीही मदत, मार्गदर्शन करण्याची तयारी कौस्तुभ बारवडे यांनी दाखवली आहे.वार्षिक सरासरी किलोला मिळणारे दरझुकेनी- ३० ते ३५ रुपये -ब्रोकोली- २५ ते ३० -चेरी टोमॅटो- ३५ ते ४० -पॉपचाई- १५ ते २५ -बेसिल- मुंबई, पुणे - ३०, तर हैदराबाद - ५० रुपये

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी