शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतच्या बातमीची दखल, डेंग्यू-चिकनगुनियाचा सर्व्हे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 19:51 IST

dengue Hospital Sangli : म्हैसाळमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आता डेग्यू व चिकनगुनीयाच्या साथीने तोंड वर काढले आहे. या आशयाची बातमी लोकमतने १० मे रोजी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेऊन आज सांगली जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाची टिम आज म्हैसाळ मध्ये दाखल झाली.याबद्दल नागरीकांनी लोकमतचे कौतुक केले.

ठळक मुद्देलोकमतच्या बातमीची दखल, डेंग्यू-चिकनगुनियाचा सर्व्हे सुरूसांगली जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाची टिम म्हैसाळमध्ये दाखल

सुशांत घोरपडेम्हैसाळ : म्हैसाळमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आता डेग्यू व चिकनगुनीयाच्या साथीने तोंड वर काढले आहे. या आशयाची बातमी लोकमतने १० मे रोजी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेऊन आज सांगली जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाची टिम आज म्हैसाळ मध्ये दाखल झाली.याबद्दल नागरीकांनी लोकमतचे कौतुक केले.जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाचे किटक संहारक अनिल खराडे, क्षेत्रकार्यकरता योगेश पाटील, किरण पाटील, आरोग्य सेवक सुहास डोंगरे यांनी गावातील शेडबाळ रस्ता, बंगला रोड, अंबिकनगर या भागाची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर अनेक ठिकाणच्या पाण्याच्या टाकीत त्यांना डेग्यू व चिकनगुनियाचे डास आढळून आले असून काही पाण्याच्या टाकीमध्ये त्यांनी म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केद्रांतून गप्पी मासे सोडले आहेत.

काही जणांना पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यांच्या सुचना दिल्या आहेत. ही टिम दोन दिवस म्हैसाळमध्ये तपासणी करणार आहे.अन्य कोणत्या ठिकाणी या साथीचा फैलाव होत असल्यास आरोग्य विभागाला याबाबत कळवावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ नंदकुमार खंदारे, अशोक वडर उपस्थित होते. 

लोकमतने १० मे  रोजी म्हैसाळ मध्ये डेग्यू व चिकनगुनियाची साथ अशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्या बातमीची दखल घेत आम्ही सांगलीजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आज तपासणी करण्यासाठी हजर झालो आहोत. काही ठिकाणी तपासणी झाली आहे. तेथे डेग्यू व चिकनगुनियाचे डास आढळून आले आहेत.तेथे गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. अद्याप इतर ठिकाणची तपासणी करणार आहोत.- अनिल खराडेकिटक संहारक, जिल्हा परीषद आरोग्य (हिवताप) विभाग -सांगली

म्हैसाळ मध्ये डेग्यू व चिकनगुनियाचे रूग्ण आढळत आहेत.ज्यांना लक्षणे आहेत त्यांच्या रक्ताची तपासणी करून त्याच्यावर उपचार केले जातील-डॉ नंदकुमार खंदारेवैद्यकीय अधिकारी, म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केद्र

लोकमतच्या बातमीची दखल, लोकमतचे कौतुकडेग्यू व चिकनगुनीया बाबत आवाज उठवावी अशी मागणी लोकमच्या वाचकांकडून होत होती.त्यानुसार लोकमतने १० मे  रोजी म्हैसाळ मध्ये डेग्यू व चिकनगुनियाची साथ अशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्या बातमीची दखल घेत दुसऱ्या दिवशी जिल्हा परीषदेची आरोग्य विभागाची टिम म्हैसाळ मध्ये दाखल झाली आहे. त्याचे नागरीकांनी लोकमतचे कौतुक केले.

टॅग्स :dengueडेंग्यूhospitalहॉस्पिटलzpजिल्हा परिषदSangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्या