शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
4
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
5
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
6
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
7
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
8
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
9
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
10
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
11
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
12
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
13
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
14
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
15
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
16
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
17
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
18
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
19
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
20
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल

स्वयंशिस्त पाळा, अन्यथा लॉकडाऊनचा पर्याय खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 16:40 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही लोकांकडून अनेक नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे आता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वयंशिस्त पाळणे आवश्यक बनले आहे. मास्कचा वापर करण्यासह सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. गर्दी वाढल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यास लॉकडाऊनचा पर्याय खुला ठेवल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिला.

ठळक मुद्देस्वयंशिस्त पाळा, अन्यथा लॉकडाऊनचा पर्याय खुलाजिल्हाधिकाऱ्यांचा इशारा; कोरोना नियंत्रणासाठी यंत्रणेचे नियोजन

सांगली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही लोकांकडून अनेक नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे आता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वयंशिस्त पाळणे आवश्यक बनले आहे. मास्कचा वापर करण्यासह सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. गर्दी वाढल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यास लॉकडाऊनचा पर्याय खुला ठेवल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिला.कोरोना उपाययोजनांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागल्यास लॉकडाऊनचा पर्याय खुला ठेवला आहे. त्यामुळे हा पर्याय अंमलात आणू नये यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून प्रशासनास सहकार्य करावे. बँका, बेकरी, इतर दुकानदारांकडे होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. खासगी डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा देताना पीपीई कीट व अन्य संरक्षक सामग्रीचा वापर करावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वत:चे थर्मामीटर, पल्स आॅक्सिमीटर घेऊन तपासणी करावी. आॅक्सिजनची पातळी ९२ च्या खाली आल्यास त्वरित आरोग्य तपासणी करून घ्यावी.मिरजेच्या कोविड रूग्णालयातील अतिदक्षता विभागात बेडची क्षमता वाढविण्यात येत आहे, तर भारती हॉस्पिटल येथेही क्षमता वाढविण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेशी संलग्नित असणारी खासगी मल्टीस्पेशालिटी रूग्णालयेही उपचारासाठी घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा म्हणाले, कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच आता काही दिवसात विविध सण, उत्सव येत आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची मिरवणूक निघणार नाही, लोक जमा होणार नाहीत, याबाबत स्पष्ट आदेश देण्यात येणार आहेत. कोरोनासंदर्भात अफवा पसरविणाऱ्या ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून हा काळ अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे सामाजिक माध्यमे किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून अफवा पसरवू नयेत, अन्यथा कडक कारवाई क रण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी