वाळवा, शिरगाव येथे पूरपरिस्थितीबाबत चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:29 AM2021-05-27T04:29:40+5:302021-05-27T04:29:40+5:30

आष्टा : तहसिलदार दीक्षान्त देशपांडे यांनी वाळवा आणि शिरगाव परिसरांत यांत्रिकी बोटीमधून प्रवास करून बोटींची चाचणी घेतली. पूर परिस्थितीबाबत ...

Flood test at Valva, Shirgaon | वाळवा, शिरगाव येथे पूरपरिस्थितीबाबत चाचणी

वाळवा, शिरगाव येथे पूरपरिस्थितीबाबत चाचणी

googlenewsNext

आष्टा : तहसिलदार दीक्षान्त देशपांडे यांनी वाळवा आणि शिरगाव परिसरांत यांत्रिकी बोटीमधून प्रवास करून बोटींची चाचणी घेतली. पूर परिस्थितीबाबत पाहणी केली.

पूर परिस्थितीचा मुकाबला करण्याबाबत चाचपणी करण्यात येत आहे. वाळवा तालुक्यातील शिरगाव येथे एनडीआरएफच्या पथकाकडून सुमारे १२ व्यक्तींना बोट चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. गतवर्षी वाळवा, शिरगाव या गावांना प्रत्येकी एक यांत्रिक बोट देण्यात आली आहे. यासह अन्य बोटी, होडी यांची चाचपणी तहसीलदार देशपांडे, पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी केली. यावेळी प्रशिक्षण घेतलेले संतोष आंबी, चेतन भिलवडे, श्रीकांत ठिगळे यांनी नदीमध्ये दोन किलोमीटरपर्यंत बोट चालवून दाखविली. पंचायत समितीचे उपसभापती नेताजीराव पाटील, मिलिंद थोरात उपस्थित होते.

फोटो : वाळवा, शिरगाव येथे कृष्णा नदीमध्ये यांत्रिक बोटी चालवून तहसिलदार दीक्षान्त देशपांडे, पोलीस निरीक्षक अजित सिद, पंचायत समिती उपसभापती नेताजीराव पाटील यांनी पूरपरिस्थितीबाबत चाचणी केली.

Web Title: Flood test at Valva, Shirgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.