शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी साहेब, आमचे भविष्य अंधकारमय करू नका; जुन्या पेन्शनसाठी पाच हजारांवर शिक्षकांची पत्राद्वारे मागणी

By अशोक डोंबाळे | Updated: September 5, 2023 14:00 IST

शिक्षक दिनी जुनी पेन्शन शिक्षक संघटनेचे अनोखे आंदोलन

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, सेवानिवृत्तीनंतरचे आम्हा शिक्षक, शासकीय कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधकारमय होऊ नये, यासाठी जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करा, अशी मागणी करणारी पत्र पाच हजार शिक्षकांनी पंतप्रधानांना मंगळवारी पाठविली.पोस्ट कार्यालयाच्या बाहेर अनेक शिक्षक एकत्र जमले होते. शिक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, संपूर्ण देशभर आज शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. आपल्या नेतृत्त्वात भारत जगात आपली नवीन ओळख बनवत आहे. उद्याचा जबाबदार, प्रतिभाशाली, संवेदनशील, नागरिक आमच्या शाळातून घडला पाहिजे, यासाठी आम्ही सर्वतोपरी योगदान देत आहोत, शिक्षक ज्ञानदानाचे काम करत आहेत. सैनिक सीमेवर राहून देशाचे रक्षण करत आहेत. त्यांच्याबद्दल माझी मन की बात आपल्याला सांगावी वाटत आहे. म्हणून हे पत्र लिहीत आहे. आपण आमच्या भावना समजून घ्याल, हा विश्वास आहे.आज शिक्षक म्हणून काम करताना आमच्या सेवानिवृत्तीनंतर काय? असा प्रश्न मला आणि देशभरातील राष्ट्रीय पेन्शन योजना लागू असणाऱ्या शिक्षक व सर्वच कर्मचारी यांना पडला आहे. याचे कारण ही शेअर मार्केट आधारित योजना उद्याच्या प्रगत भारतात आम्हा कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशी नाही, हे आता लक्षात येत आहे. तरी

आपण आमचे सेवानिवृत्तीनंतरचे भविष्य अंधकारमय होऊ देणार नाही, अशी अपेक्षा आहे. माझी आपणास आजच्या शिक्षक दिनी विनंती आहे की, आपण सर्व शिक्षक, सैनिक तसेच देशातील सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांना सध्याची राष्ट्रीय पेन्शन योजना बदलून जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही विनंती.या अनोख्या आंदोलनात जुनी पेन्शन संघटनेचे विभागीय अध्यक्ष सागर खाडे, जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार भोसले, मिरज तालुकाध्यक्ष रमेश मगदूम, तालुका संघटक अझरुद्दीन जमादार, वैजनाथ आवताडे, अनिल मुंडे, अमोल सातपुते, शिक्षक नेते सुधाकर हजारे आदीसह जिल्ह्यातील पाच हजारांवर शिक्षक सहभागी झाले होते.

आंदोलनाची तीव्रता वाढविणारआतापर्यंत शिक्षकांचे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. केंद्र आणि राज्य शासनाने शिक्षकांसह सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे गरजेचे होते. पण, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यास यापुढे तीव्र आंदोलन करावे लागणार आहे, असा इशारा जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिदे यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षकPensionनिवृत्ती वेतनNarendra Modiनरेंद्र मोदी