शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोंत्यावबोबलादच्या सरपंचासह पाचजण तडीपार ; एलसीबीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 20:28 IST

या टोळीतील नंदकुमार करे हा सरपंच असल्याने राजकीय क्षेत्रातही त्याचा पुढाकार असतो. टोळीतील सर्व सदस्य हे एक मेकांचे चुलत भाऊ व नातलग आहेत.

ठळक मुद्देन्यायालयातून जामिनावर सुटल्यानंतर ते पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे करत आहेत. यामुळे उमदी परिसरातील नागरिकांना त्रास होत होता.

सांगली : खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरीसह उमदी परिसरात दहशत माजविणाऱ्या कोंत्यावबोबलाद (ता. जत)चा सरपंच नंदकुमार करे व त्याच्या चार साथीदारांना तीन जिल्'ातून तडीपार करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.

शिवाजी भिवा करे (वय ३०), नंदकुमार भिवा करे (२९), आप्पासाहेब ऊर्फ आप्पा लिंबाजी लोखंडे (४४), गोरख लिंबाजी लोखंडे (३९), बबन रामा करे (३९, सर्व रा. कोंत्यावबोबलाद, ता. जत) यांना सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्'ातून तडीपार करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नंदकुमार करे हा कोंत्यावबोबलादचा सरपंच असून त्याच्या नेतृत्वाखालीच त्याचा भाऊ शिवाजी करे हा टोळी चालवितो. दोघांनी मिळून एक टोळी निर्माण केली असून खून करणे, खुनाचा प्रयत्न, सशस्त्र दरोडा, जबरी चोरी, मारामारी करणे यासह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत.

न्यायालयातून जामिनावर सुटल्यानंतर ते पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे करत आहेत. यामुळे उमदी परिसरातील नागरिकांना त्रास होत होता. या टोळीतील नंदकुमार करे हा सरपंच असल्याने राजकीय क्षेत्रातही त्याचा पुढाकार असतो. टोळीतील सर्व सदस्य हे एक मेकांचे चुलत भाऊ व नातलग आहेत.या टोळीविरोधात कारवाईचा प्रस्ताव उमदी पोलीस ठाण्याने सादर केला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी हद्दपारीच्या प्रस्तावास मंजुरी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सिध्दाप्पा रूपनर, विशाल भिसे, दीपक गट्टे आदींनी केली.

 

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी