शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेतून पाच बोटी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 11:35 IST

Muncipal Corporation Sangli- : २००५-०६ मध्ये कृष्णा नदीला आलेल्या महापुरानंतर शासनाने महापालिकेला सहा बोटी दिल्या होत्या. पण त्यापैकी पाच बोटी गायब झाल्या आहेत, तर एका बोटीची अवस्था जळणात घालण्यासारखी झाली आहे.

ठळक मुद्दे सांगली महापालिकेतून पाच बोटी गायब गैरकारभार चव्हाट्यावर : स्थायी सभेत चौकशीचे आदेश

सांगली : २००५-०६ मध्ये कृष्णा नदीला आलेल्या महापुरानंतर शासनाने महापालिकेला सहा बोटी दिल्या होत्या. पण त्यापैकी पाच बोटी गायब झाल्या आहेत, तर एका बोटीची अवस्था जळणात घालण्यासारखी झाली आहे.

या पाच बोटी नेमक्या कुठे गायब झाल्या, त्या चोरीला गेल्या, की आपत्ती व्यवस्थापनाकडील कर्मचाऱ्यांना परस्परच विकल्या, याचा शोध घेण्याची मागणी नगरसेवक गजानन मगदूम यांनी शुक्रवारी स्थायी समिती सभेत केली. सभापती पांडुरंग कोरे यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.मगदूम म्हणाले की, कृष्णा नदीला पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या महापुरात नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. महापालिकेकडे यांत्रिकी बोटी नव्हत्या. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत अनेक गोष्टींचा अभाव होता. त्यामुळे शासनाने महापालिकेला सहा बोटी दिल्या.

या बोटी अग्निशमन विभागाकडे होत्या. २००५-०६ नंतर शहरात महापूर आला नाही. २०१९ मध्ये पुन्हा महापुराने शहरात थैमान घातले. तेव्हाही बोटींची कमरतता दिसून आली.याचदरम्यान प्रशासनाने नव्याने बोटी खरेदीचा विषय स्थायी समितीसमोर पाठविला होता. पण गत महापुरातील सहा बोटींची माहिती घेता, पाच बोटी गायब असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बोटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमत करून विकल्या आहेत.

याबाबत अग्निशमन विभागाकडे माहितीही विचारली. पण अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे स्थायी समिती सभेत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. सभापती कोरे यांनी तसे आदेश प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले.संगनमत करून बोटी विकल्यामगदूम म्हणाले की, अग्निशमन विभागाकडील तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून या बोटी विकल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. अधिकारी, कर्मचारीच महापालिकेच्या मालमत्तेवर डल्ला मारत आहेत. येत्या आठ दिवसात या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर फौजदारी दाखल न झाल्यास स्थायी सभा उधळून लावू, असा इशाराही दिला. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली