शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सांगली शहरात पहिल्यांदाच होणार काँक्रिटचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 17:07 IST

road safety, Pwd, Muncipal Corporation, Sangli सांगली महापालिकेच्या स्थापनेला २२ वर्षे झाल्यानंतर पहिल्यांदाच शहरात काँक्रिटचा रस्ता होणार आहे. नेहमीच खड्ड्यात रुतलेल्या राममंदिर चौक ते सिव्हिल चौक या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात हे काम पूर्ण होणार असून दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

ठळक मुद्देसांगली शहरात पहिल्यांदाच होणार काँक्रिटचा रस्ता राममंदिर चौक ते सिव्हिल चौकाचे काम सुरू : दीड कोटीचा खर्च अपेक्षित

सांगली : महापालिकेच्या स्थापनेला २२ वर्षे झाल्यानंतर पहिल्यांदाच शहरात काँक्रिटचा रस्ता होणार आहे. नेहमीच खड्ड्यात रुतलेल्या राममंदिर चौक ते सिव्हिल चौक या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात हे काम पूर्ण होणार असून दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.सांगली बसस्थानक, सिव्हिल रुग्णालयाकडे जाणारा हा रस्ता सर्वात वर्दळीचा आहे. काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावरील अतिक्रमणे महापालिकेने हटविली होती. या रस्त्यावर आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. पण महिन्याभरानंतर पुन्हा रस्ता खराब होत असे.

पावसाळ्यात तर या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडतात. सिव्हिल चौकात तर पाण्याचे तळे साचलेले असते. हा रस्ता दुरूस्तीची मागणी वारंवार केली जात होती. पण पॅचवर्क करूनही रस्ता कधीच सुस्थितीत नव्हता.आयुक्त नितीन कापडणीस यांनी या रस्त्याची पाहणी करून तो आयडियल बनविण्याचा निर्धार केला. त्यानुसार रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. बांधकाम विभागाने एक कोटी ४३ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले.

आता प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरू झाले आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथ आणि पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी भुयारी वाहिनीची व्यवस्था केली जाणार आहे. शहरात पहिल्यांदाच काँक्रिटचा रस्ता होत आहे. यापूर्वी डांबरी रस्त्यावर महापालिकेकडून खर्च होत होता.दोन महिने रस्ता बंदराममंदिर चौक ते सिव्हिल चौक हा रस्ता दोन महिन्यासाठी बंद करण्यात आला आहे. सध्या रस्त्यावरील ड्रेनेज व जलवाहिनी स्थलांतराचे काम सुरू आहे. ते झाल्यानंतर काँक्रिटचे काम हाती घेतले जाणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक पुष्पराज चौकमार्गे वळविण्यात आली आहे.मिरजेतही काँक्रिटीकरणसांगलीपाठोपाठ मिरजेतील शहर बसस्थानक ते रेल्वे स्थानकापर्यंतच्या रस्त्याचेही काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामाचीही निविदा काढण्यात आली आहे. लवकरच या कामालाही सुरूवात होणार असल्याचे शहर अभियंता आप्पा हलकुडे यांनी सांगितले. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिकाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग